उंची वाढवायचीय? सकाळी 'ही' पाच आसने करा | Exercise For Height Growth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंची वाढवायचीय? सकाळी 'ही' पाच आसने करा

Exercise For Height Growth

योगासने ही प्रभावी स्ट्रेचिंग व्यायाम आहे. तुमची उंची वाढवण्यास योगासने तुम्हाला मदत करू शकतो. अनेकांची उंची कमी असते. अशावेळी ती कशी वाढवायची ते लोकांना कळत नाही. पण, जर तुम्ही तरुण असाल तर उंची वाढवण्यासाठी योगासने फायदेशीर ठरतात. योगाभ्यासामुळे शरीर ताणले जाते. उंची वाढवण्यासाठी व्यायामाचा अनेकांना फायदा होतो. तसेच संतुलित आहार, योग्य प्रमाणात झोप, शारीरिक व्यायाम केल्यास त्याचाही फायदा होतो.

1) ताडासन- ताडासन हे सर्वात महत्त्वाच्या योगासनांपैकी एक आहे जर एखाद्याने ही योगमुद्रा योग्य तंत्राने केली तर त्याची  उंची वाढवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. ताडासनामुळे बोटांवर पुरेसा ताण येतो. त्याच्या नियमित अभ्यासामुळे तुमची उंची वाढण्यास मदत मिळू शकते. तसेच योग्य तंत्र - दृष्टिकोन ठेवून या आसनाचा नियमित सराव केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. अंगठ्यापासून बोटांपर्यंत शरीरातील अतिरिक्त चरबीही या आसनामुळे कमी होऊ शकते.

2) त्रिकोणासन - त्रिकोणी मुद्रा आणि त्याची वेगवेगळी रूपे शरीराला ताणण्यासाठी पुरेशी आहेत. त्रिकोणासनामुळे तुमचे स्नायू, नसा ताणल्या जातात. तसेच हाडांवरही परिणाम होतो. या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे तुमची उंची वाढण्यास मदत होते.

3) उत्थिता पार्श्वकोणासन- हे आसन केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच सहनशक्ती वाढवण्यास, शरीराला टोन करण्यास आणि उंची वाढविण्यात हे आसन मदत करते. वजन कमी करण्यासाठी हे आसन चांगले आहे. तसेच छाती वाढवण्यासाठी ते योग्य मानले जाते. तसेच हे आसन केल्यामुळे कंबर आणि नितंबांभोवतीची चरबी कमी होते.

4) वीरभद्रासन - हे योग आसन सर्वात शक्तिशाली योग आसनांपैकी एक आहे. हे आसन केल्याने संपूर्ण शरीरावर ताण येतो. त्यामुळे याचा सराव करण्यासाठी लवचिकता गरजचेची आहे. या योगमुद्रेचा नियमित सराव केल्यास उंची वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच तुमचे वजन कमी करण्यासाठी हे आसन फायद्याचे आहे.

5) यस्तिकासन- या आसनाचा सराव आणि फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेत. जर तुम्ही उंची वाढविण्याच्या प्रयत्नात असाल तर वर सांगितल्याप्रमाणे योगासने करून शेवटी हे आसन करावे.  तुमच्या योगगुरूने ठराविक कालावधीसाठी हे आसन किती वेळ करायचे ते सांगितल्यास  उंची वाढण्यास मदत होते. वरील मॉड्युलमधली ही एकमेव योग मुद्रा आहे, जी दीर्घकाळ टिकवून ठेवता येते.

go to top