IND vs PAK: 'बाप बाप होता है' ते खेळाडूंची राडेबाजी; वाचा आजवरचे खुन्नसवाले किस्से | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK: बाप बाप होता है! वाचा खेळाडूंचे आजवरचे खुन्नसवाले किस्से

IND vs PAK: बाप बाप होता है! वाचा खेळाडूंचे आजवरचे खुन्नसवाले किस्से
भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा एकदा टी-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्ताने आमने-सामने येत आहेत. हार-जित हा खेळाचा भाग झाला. मात्र, हे सामने अधिक ओळखले जातात ते मैदानात दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये होणाऱ्या बाचाबाचीमुळे! भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये अशा प्रकारचे वाद, खुन्नस देणे, बाचाबाचीचे प्रकार खूपदा झालेले आहेत. अशाच काही वादांवर आज आपण नजर टाकणार आहोत.

भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा एकदा टी-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्ताने आमने-सामने येत आहेत. हार-जित हा खेळाचा भाग झाला. मात्र, हे सामने अधिक ओळखले जातात ते मैदानात दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये होणाऱ्या बाचाबाचीमुळे! भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये अशा प्रकारचे वाद, खुन्नस देणे, बाचाबाचीचे प्रकार खूपदा झालेले आहेत. अशाच काही वादांवर आज आपण नजर टाकणार आहोत.

1. गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी (2007) 
कानपूरमध्ये ग्रीन पार्क मैदानात तिसऱ्या सामन्यादरम्यान झालेली या दोघांतील बाचाबाची प्रसिद्ध आहे. हे दोन्हीही खेळाडू बॅटने तर बोलतातच शिवाय त्यांनी भर मैदानात नजरेला नजर देऊन एकमेकांसोबत वाद देखील घातलेत.

1. गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी (2007) कानपूरमध्ये ग्रीन पार्क मैदानात तिसऱ्या सामन्यादरम्यान झालेली या दोघांतील बाचाबाची प्रसिद्ध आहे. हे दोन्हीही खेळाडू बॅटने तर बोलतातच शिवाय त्यांनी भर मैदानात नजरेला नजर देऊन एकमेकांसोबत वाद देखील घातलेत.

2. इशांत शर्मा आणि कामरान अकमल (1st T20, 2012)
इशांत शर्मा आणि पाकिस्तानचा विकेट किपर कामरान अकमल यांच्यात देखील असाच वाद झाला होता. 2012 सालच्या पहिल्या टी-ट्वेंटी दरम्यान ही बाचाबाची पाहायला मिळाली होती.

2. इशांत शर्मा आणि कामरान अकमल (1st T20, 2012) इशांत शर्मा आणि पाकिस्तानचा विकेट किपर कामरान अकमल यांच्यात देखील असाच वाद झाला होता. 2012 सालच्या पहिल्या टी-ट्वेंटी दरम्यान ही बाचाबाची पाहायला मिळाली होती.

3. किरण मोरे आणि जावेद मियादाद 
भारत-पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रोलियात 1992 साली झालेल्या वर्ल्डकपमधील हा किस्सा आहे. किरण मोरे आणि जावेद मियादाद यांच्यात जबरदस्त खुन्नस देणे चालू होते. या मॅचमध्ये जावेद मियादादने सिक्स मारल्यावर किपर असलेल्या किरण मोरेसमोर माकडासारख्या उड्या मारत खिजवण्याचा प्रयत्न केला होता. सरतेशेवटी अंपायर असलेल्या डेविड शेफर्ड यांना यात मध्यस्थी करावी लागली होती.

3. किरण मोरे आणि जावेद मियादाद भारत-पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रोलियात 1992 साली झालेल्या वर्ल्डकपमधील हा किस्सा आहे. किरण मोरे आणि जावेद मियादाद यांच्यात जबरदस्त खुन्नस देणे चालू होते. या मॅचमध्ये जावेद मियादादने सिक्स मारल्यावर किपर असलेल्या किरण मोरेसमोर माकडासारख्या उड्या मारत खिजवण्याचा प्रयत्न केला होता. सरतेशेवटी अंपायर असलेल्या डेविड शेफर्ड यांना यात मध्यस्थी करावी लागली होती.

4. गौतम गंभीर आणि कमरान अकमल (2010 आशिया कप)
गौतम गंभीरची आफ्रिदीशिवाय कामरान अकमलसोबत देखील बाचाबाची झाली होती. पाकिस्तानचा यष्टीरक्षक असलेला अकमल अपिल करताना अधिक  हावभाव करत असल्यामुळे गंभीर चिडला आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेलं पहायला मिळालं.

4. गौतम गंभीर आणि कमरान अकमल (2010 आशिया कप) गौतम गंभीरची आफ्रिदीशिवाय कामरान अकमलसोबत देखील बाचाबाची झाली होती. पाकिस्तानचा यष्टीरक्षक असलेला अकमल अपिल करताना अधिक हावभाव करत असल्यामुळे गंभीर चिडला आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेलं पहायला मिळालं.

5. राहुल द्रविड आणि शोएब अख्तर (19 सप्टेंबर 2004)
राहुल द्रविड आणि शोएब अख्तर यांच्यात अनेक खटके उडाले होते. 2004 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एजबॅस्टन मैदानात हा वाद पहायला मिळाला होता.

5. राहुल द्रविड आणि शोएब अख्तर (19 सप्टेंबर 2004) राहुल द्रविड आणि शोएब अख्तर यांच्यात अनेक खटके उडाले होते. 2004 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एजबॅस्टन मैदानात हा वाद पहायला मिळाला होता.

6. व्यंकटेश प्रसाद आणि आमीर सोहील  (1996 वर्ल्डकप)
पहिल्यांदा बॅटींग केलेल्या भारताने 287 धावा केल्या होत्या. त्या गाठताना आमीर सोहीलने अर्धशतक केले होते. सोएल वारंवार व्यंकटेश प्रसादला उचकवण्याचा प्रयत्न करत होता. भारताला विकेटची गरज होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बाचाबाचीने मैदानातील वातावरण अधिकच गरमागरम झाले होते.

6. व्यंकटेश प्रसाद आणि आमीर सोहील (1996 वर्ल्डकप) पहिल्यांदा बॅटींग केलेल्या भारताने 287 धावा केल्या होत्या. त्या गाठताना आमीर सोहीलने अर्धशतक केले होते. सोएल वारंवार व्यंकटेश प्रसादला उचकवण्याचा प्रयत्न करत होता. भारताला विकेटची गरज होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बाचाबाचीने मैदानातील वातावरण अधिकच गरमागरम झाले होते.

7. हरबजन सिंग आणि शोएब अख्तर (2010 Asia Cup)
स्ट्राईकवर असलेल्या हरबजन सिंगने सिक्स मारल्यावर जोरात ओरडून आनंद व्यक्त केला. या दरम्यान शोएब अख्तरने हरबजनला काहीतरी म्हटलं ज्यामुळे तो चिडला. यातून वाद त्यांच्यात वाद झाले होते. सामन्याच्या शेवटी झालेला हा वाद आजही आठवला जातो.

7. हरबजन सिंग आणि शोएब अख्तर (2010 Asia Cup) स्ट्राईकवर असलेल्या हरबजन सिंगने सिक्स मारल्यावर जोरात ओरडून आनंद व्यक्त केला. या दरम्यान शोएब अख्तरने हरबजनला काहीतरी म्हटलं ज्यामुळे तो चिडला. यातून वाद त्यांच्यात वाद झाले होते. सामन्याच्या शेवटी झालेला हा वाद आजही आठवला जातो.

8. वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर
वीरू म्हणाला शोएबला ‘बाप, बाप होता है…’ हा किस्सा तुम्हाला माहितीच असेल. एका लढतीत पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर आणि सेहवागची शाब्दिक चकमक उडाली होती. लढतीदरम्यान अख्तर सेहवागलासारखे बाउन्सर टाकत होता आणि प्रत्येक वेळी तो त्याला हुक करून दाखव, असे म्हणायचा. काही चेंडूंनंतर सेहवाग अख्तरला म्हणाला, की दुसऱ्या एन्डला तुझे वडील फलंदाजी करीत आहेत. त्याला हुक करायला सांग. तो नक्कीच करून दाखवेल. दुसऱ्या एन्डला सचिन तेंडुलकर फलंदाजी करत होता. अख्तरने त्याला बाउन्सर टाकला. सचिनने तो चेंडू हुक करतन षटकार ठोकला. हे पाहून सेहवाग तात्काळ पुढे आला आणि अख्तरला म्हणाला, बेटा, बेटा होता है… बाप. बाप होता है…

8. वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर वीरू म्हणाला शोएबला ‘बाप, बाप होता है…’ हा किस्सा तुम्हाला माहितीच असेल. एका लढतीत पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर आणि सेहवागची शाब्दिक चकमक उडाली होती. लढतीदरम्यान अख्तर सेहवागलासारखे बाउन्सर टाकत होता आणि प्रत्येक वेळी तो त्याला हुक करून दाखव, असे म्हणायचा. काही चेंडूंनंतर सेहवाग अख्तरला म्हणाला, की दुसऱ्या एन्डला तुझे वडील फलंदाजी करीत आहेत. त्याला हुक करायला सांग. तो नक्कीच करून दाखवेल. दुसऱ्या एन्डला सचिन तेंडुलकर फलंदाजी करत होता. अख्तरने त्याला बाउन्सर टाकला. सचिनने तो चेंडू हुक करतन षटकार ठोकला. हे पाहून सेहवाग तात्काळ पुढे आला आणि अख्तरला म्हणाला, बेटा, बेटा होता है… बाप. बाप होता है…