IND vs SA -ODI : 'गब्बर इज बॅक'; नेटमध्ये जोरदार फटकेबाजी, पण...

indian team started practicing in net before India vs South Africa odi series
indian team started practicing in net before India vs South Africa odi seriessakal
Updated on

केपटाऊन कसोटी सामन्यात टीम इंडियाला सात विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. सेंच्युरिअन जिंकल्यानंतर भारतीय संघाचा खेळ बिघडला. उर्वरित दोन कसोटी सामने गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्नही भंगले आहे.

भारतीय संघाने आता वनडे मालिकेची तयारी सुरू केली आहे. यासाठी एकदिवसीय संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी सरावही सुरू केला आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, इशान किशन आणि इतर भारतीय खेळाडू दिसत आहेत.
भारतीय संघाने आता वनडे मालिकेची तयारी सुरू केली आहे. यासाठी एकदिवसीय संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी सरावही सुरू केला आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, इशान किशन आणि इतर भारतीय खेळाडू दिसत आहेत.sakal
धवनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खेळाडूंसोबत कसून सराव केला.  याशिवाय धवनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सराव सत्राशी संबंधित एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये धवन नेटमध्ये दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे.
धवनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खेळाडूंसोबत कसून सराव केला. याशिवाय धवनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सराव सत्राशी संबंधित एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये धवन नेटमध्ये दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे.sakal

शिखर धवन अनेक महिन्यांनंतर मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये परतला आहे. तो पुन्हा मैदानात दमदार कमबॅक करण्यासाठी उत्सुक दिसतोय. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. टीम इंडियाने गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा शिखर धवनने वनडे आणि T-20 मालिकेचे नेतृत्व केले होते.  2021 मध्ये, धवनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 59.40 च्या सरासरीने 297 धावा केल्या.  आयपीएलच्या 14व्या हंगामातही धवनची कामगिरी उत्कृष्ट होती.
शिखर धवन अनेक महिन्यांनंतर मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये परतला आहे. तो पुन्हा मैदानात दमदार कमबॅक करण्यासाठी उत्सुक दिसतोय. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. टीम इंडियाने गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा शिखर धवनने वनडे आणि T-20 मालिकेचे नेतृत्व केले होते. 2021 मध्ये, धवनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 59.40 च्या सरासरीने 297 धावा केल्या. आयपीएलच्या 14व्या हंगामातही धवनची कामगिरी उत्कृष्ट होती.sakal
युजवेंद्र चहलनेही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ऋतुराज गायकवाड आणि भुवनेश्वर कुमारसोबत मैदानाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. यासोबतच चहलने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.
युजवेंद्र चहलनेही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ऋतुराज गायकवाड आणि भुवनेश्वर कुमारसोबत मैदानाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. यासोबतच चहलने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. sakal
लेगस्पिनर चहलने गेल्या वर्षी आयपीएलच्या यूएई लेगमध्ये चमकदार कामगिरी केली होती.  यानंतर त्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्यात आले नाही, ज्यावर बरीच टीका झाली होती.  आता चहल एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल.
लेगस्पिनर चहलने गेल्या वर्षी आयपीएलच्या यूएई लेगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. यानंतर त्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्यात आले नाही, ज्यावर बरीच टीका झाली होती. आता चहल एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल.sakal
इशान किशन, व्यंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या सर्व खेळाडूंना इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास चांगली कामगिरी करण्याचा विचार असेल. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज आणि व्यंकटेश यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर इशान किशननेही भारतासाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
इशान किशन, व्यंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या सर्व खेळाडूंना इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास चांगली कामगिरी करण्याचा विचार असेल. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज आणि व्यंकटेश यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर इशान किशननेही भारतासाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.sakal
एकदिवसीय मालिकेची सुरुवात 19 जानेवारीला पार्ल येथे होणाऱ्या सामन्याने होणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामना पार्लमध्येच खेळवला जाईल आणि २३ जानेवारीला शेवटचा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल. विशेष म्हणजे 2017-2018 दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिका 5-1 अशी जिंकली होती.
एकदिवसीय मालिकेची सुरुवात 19 जानेवारीला पार्ल येथे होणाऱ्या सामन्याने होणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामना पार्लमध्येच खेळवला जाईल आणि २३ जानेवारीला शेवटचा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल. विशेष म्हणजे 2017-2018 दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिका 5-1 अशी जिंकली होती.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com