Friendship Day: मैदानावर शत्रू पण मैदानाबाहेर दिल दोस्ती दुनियादारी
International Friendship Day: आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. T20 क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून जगभरात अनेक लीग आयोजित करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये जगातील महान संघांचे अनेक स्टार खेळाडू एकत्र खेळताना दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच भारतीय क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मैदानात शत्रूंशी घट्ट मैत्री केली आणि मैत्रीचे उत्तम उदाहरण ठेवले आहे.
क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांची मैत्री उदाहरण मानली जाते. काही महिन्यांपूर्वी खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान एबी डिव्हिलियर्सची मदत घेतल्याचे सांगितले होते. दोघांचे फोनवर बोलणे झाले आणि त्यांच्या मदतीनेच कोहली फॉर्ममध्ये परत येऊ शकला. विराट-एबीसोबतच त्यांच्या पत्नी आणि मुलीही चांगल्या मैत्रिणी आहेत.
मलिंगा आणि बुमराहची मैत्री 2013 पासूनची आहे. बुमराह जेव्हा मलिंगाला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. भारतीय गोलंदाजाने अनेकदा श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मदत केल्याबद्दल आणि यशस्वी गोलंदाज बनण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे श्रेय दिले आहे.
विराट कोहली आणि युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल हे खूप चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. दोन्ही क्रिकेटपटूंची एकमेकांशी चांगली बॉन्डिंग असते. त्यांची मैत्री भारतीय आयपीएल पासुन आहे. जेव्हा दोघेही एकाच संघासाठी खेळायचे, आता वेगवेगळ्या संघांसोबत खेळूनही दोघेही चांगले मित्र आहेत.
हार्दिक पांड्या आणि किरॉन पोलार्ड हे दोन असे खेळाडू आहेत ज्यांचे आयपीएल दरम्यान मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले संबंध आहेत. हार्दिक आणि पोलार्ड बर्याचदा एकत्र, पार्टी आणि हँग आउट करताना चांगले वेळ घालवताना दिसतात.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि CSK सलामीवीर फाफ डू प्लेसिसचा खूप चांगला मित्र आहे. सीएसकेला 3 वेळा चॅम्पियन बनवण्यात या दोन्ही खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे.