IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) सात गडी राखून पराभव केला. सनरायझर्स हैदराबादचा हा सलग तिसरा विजय होता. संघाच्या विजयाचे हिरो राहुल त्रिपाठी आणि एडन मार्कराम ठरले.
सामन्यात एकापेक्षा एक मस्त अशी कामगिरी पाहायला मिळाली. कोलकाताकडून नितीश राणाने अर्धशतक झळकावले आहे, तर आंद्रे रसेलने ही चांगली कामगिरी केली आहे. मात्र, या कामगिरीनंतरही कोलकाताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनने सनरायझर्स हैदराबादला सामन्यात चांगली सुरुवात करून दिली. प्रथम व्यंकटेश अय्यर मग त्यानंतर एकाच षटकात श्रेयस अय्यर आणि सुनील नरेनचे विकेटही घेतले आहे.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी नितीश राणाने सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. राणाच्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. नितीश राणाचे या हंगामात पहिले अर्धशतक होते.
आंद्रे रसेलने कोलकात्याला 175 धावांपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा आहे. रसेलने अवघ्या 25 चेंडूत तब्बल चार षटकार आणि चौकारांच्या मदतीने नाबाद 49 धावांची खेळी केली. यानंतर त्याने गोलंदाजीतही दोन बळी घेतले.
सनरायझर्स हैदराबादच्या पॉवरप्लेमध्ये दोन विकेट पडल्या असताना. राहुल त्रिपाठीने शानदार खेळी करत कोलकाता गोलंदाजाना एका हाती घेतले. त्रिपाठीने अवघ्या 37 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 71 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्करामनेही राहुल त्रिपाठीला चांगली साथ दिली. एडन मार्करामने राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. एडन मार्करामने 6 चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 68 धावा केल्या.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.