Photo Story : टीम इंडियाचे तिकीट हुकलेले पाच 'कमनशिबी' खेळाडू

Ireland Tour Team India Announce 5 Cricket Miss The Opportunity
Ireland Tour Team India Announce 5 Cricket Miss The Opportunityesakal
Updated on

आर्यलंडविरूद्धच्या दोन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे आर्यलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले. या संघाचे नेतृत्व आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पांड्या करणार आहे. या संघात राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन या आयपीएल गाजवण्याऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र आयपीएलमध्येच दमदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंकडे निवडसमितीने कानाडोळा केलेला दिसतो. (Ireland Tour Team India Announce 5 Cricket Miss The Opportunity)

1 पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
मुंबई रणजी संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ भारतासाठी अजूनही टी 20 क्रिकेटमधील एक महत्वाचा खेळाडू समजला जातो. मात्र त्याला एकाच टी 20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. मात्र आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्याने 147 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने संघाला आक्रमक सुरूवात करून दिली आहे. तरी देखील त्याला आर्यलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
1 पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मुंबई रणजी संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ भारतासाठी अजूनही टी 20 क्रिकेटमधील एक महत्वाचा खेळाडू समजला जातो. मात्र त्याला एकाच टी 20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. मात्र आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्याने 147 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने संघाला आक्रमक सुरूवात करून दिली आहे. तरी देखील त्याला आर्यलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळाले नाही. esakal
2 नितीश राणा (Nitish Rana) 
नितीश राणा गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात होता. तेथे त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याने चांगली फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत त्याला संघात स्था मिळाले नाही. याबद्दल त्याने सोशल मीडियावर आपली निराशा देखील व्यक्त केली होती.
2 नितीश राणा (Nitish Rana) नितीश राणा गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात होता. तेथे त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याने चांगली फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत त्याला संघात स्था मिळाले नाही. याबद्दल त्याने सोशल मीडियावर आपली निराशा देखील व्यक्त केली होती. esakal
टी नटराजन (T Natarajan)
यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेल्या टी नटराजनने 2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने 4 टी 20 सामने खेळले होते. त्यात 7 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या 15 व्या हंगामात देखील त्याने 11 सामन्यात 18 विकेट घेतल्या. तरी देखील निवडसमितीने आर्यलंड दौऱ्यासाठी त्याचा विचार केला नाही.
टी नटराजन (T Natarajan) यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेल्या टी नटराजनने 2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने 4 टी 20 सामने खेळले होते. त्यात 7 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या 15 व्या हंगामात देखील त्याने 11 सामन्यात 18 विकेट घेतल्या. तरी देखील निवडसमितीने आर्यलंड दौऱ्यासाठी त्याचा विचार केला नाही. esakal
राहुल चहर (Rahul Chahar)
राहुल चहरला गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये युझवेंद्र चहलच्या जागी संघात स्थान मिळाले होते. त्याने 7 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. तरी देखील त्याचा आर्यलंड दौऱ्यासाठी विचार करण्यात आला नाही. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या राहुलने यंदाच्या हंगामात 13 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत.
राहुल चहर (Rahul Chahar) राहुल चहरला गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये युझवेंद्र चहलच्या जागी संघात स्थान मिळाले होते. त्याने 7 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. तरी देखील त्याचा आर्यलंड दौऱ्यासाठी विचार करण्यात आला नाही. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या राहुलने यंदाच्या हंगामात 13 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. esakal
राहुल तेवतिया (Rahul Tewatia)
आयपीएल 2020 मध्ये आणि त्यानंतर 2022 मध्ये दमदार कामगिरी करत राहुल तेवतियाने अनेक सामना जिंकून देणाऱ्या खेळी केली. गुजरात टायटन्सच्या विजयी घोडदौडीत त्याचाही महत्वाचा वाटा होता. मात्र तरी देखील त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्यानंतर त्याने जास्त अपेक्षा करणं वेदनादायक असतं अशी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.
राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आयपीएल 2020 मध्ये आणि त्यानंतर 2022 मध्ये दमदार कामगिरी करत राहुल तेवतियाने अनेक सामना जिंकून देणाऱ्या खेळी केली. गुजरात टायटन्सच्या विजयी घोडदौडीत त्याचाही महत्वाचा वाटा होता. मात्र तरी देखील त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्यानंतर त्याने जास्त अपेक्षा करणं वेदनादायक असतं अशी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com