Isha Ambani's Twins : ईशा अंबानीच्या बाळाची पहिली झलक!
Isha Ambani New Born Baby: ईशा अंबानीचं आज तिच्या जुळ्या मुलांसह अमेरिकेतून भारतात आगमन झालं आहे. अंबानींच्या नातवंडाचं ईशासह एअरपोर्टवर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी सगळ्यांची नजर ईशाच्या जुळ्या मुलांवर होती. अखेर ईशाच्या गोंडस बाळाची पहिली झलक पापराझींनी कॅमेरात कैद केली. तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
ईशा आणि तिचे पती आनंद पिरामल हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात आले आहेत. त्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. एवढंच काय तर बाळांची काळजी घेण्यासाठी फ्लाईटमध्ये अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत होती.
नातवंड पहिल्यांदा भारतात येत असल्याने अंबानी कुटुंब आनंदीत होतं. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी ते आज तब्बल ३०० किलो सोनं दान करणार आहे. त्यांच्या या घोषणेने सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
बाळांच्या स्वागतासाठी अंबानी कुटुबाने जय्यत तयारी केली आहे. ईशा अंबानीच्या 'करुणा सिंधू' नावाच्या घरी तब्बल एक हजार साधूसंत येणार आहेत. यासोबतच अंबानी आणि पिरामल कुटुंबा एकत्र मिळून पाच अनाथाश्रम सुरु करणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी ग्रँड सेरेमनी असणार आणि या सेरेमनीत जगभरातील फेमस शेफच्या हातून पंचपक्वान्न बनविले जाणार.