किंग कोहलीचा आयपीएल मधला 6 वर्ष जुना रेकॉर्ड 'हा' खेळाडू तोडणार? | Virat Kohli Record | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किंग कोहलीचा आयपीएल मधला 6 वर्ष जुना रेकॉर्ड 'हा' खेळाडू तोडणार?

ipl  virat kohli record

राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलर आयपीएल-2022 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यामध्ये 3 शतके झळकावली आहेत. बटलर ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचा 6 वर्षे जुना विक्रम धोक्यात आला आहे.(IPL Virat Kohli Record)

इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलरने आयपीएलच्या 15 व्या हंगामात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करत आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्यावरून असे दिसते आहे की आयपीएलचे अनेक विक्रम त्याच्या नावावर होतील.

बटलरने आतापर्यंत 3 शतके आणि तब्बल 3 अर्धशतके केली आहेत. त्याच्याकडे चालू हंगामातील ऑरेंज कॅपही आहे.

जोस बटलरने आयपीएलच्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सकडून 10 सामने खेळले आहेत. त्याने 65.33 च्या सरासरीने आणि 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 588 धावा केल्या आहेत. त्याने 50 चौकार आणि 36 षटकार मारले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2016 च्या मोसमात 16 सामने खेळले आणि एकूण 973 धावा केल्या होत्या. विराटने त्या हंगामात 4 शतके आणि 7 अर्धशतके केली होती.

विराटने या हंगामात 83 चौकार आणि 38 षटकार मारले होते. एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे.

2016 च्या मोसमात विराटने 10 सामन्यात 568 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत जोस बटलरने या शैलीत फलंदाजी केली तर साहजिकच तो विराटचा 'रेकॉर्ड' मोडू शकतो.

go to top