sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS : मोदी-शाह ते फडणवीस-शिंदे; जेपी नड्डांच्या मुलाच्या रिसेप्शनला दिग्गजांची मांदियाळी

JP Nadda
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुलगा हरीश याचं नुकतंच लग्न झालं. त्याच्या रिसेप्शनला देशभरातल्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही या सोहळ्याला उपस्थित होते.

केवळ भाजपाच नव्हे तर देशभरातल्या विविध क्षेत्रातले दिग्गज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

माजी लष्करप्रमुख व्ही के सिंह, हिमाचल प्रदेश भाजपाचे नेते, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल हेदेखील उपस्थित होते.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही सहपरिवार या सोहळ्याला हजेरी लावली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही या रिसेप्शनसाठी गेले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हरीशच्या रिसेप्शनला हजेरी लावली.

२५ जानेवारी रोजी जे पी नड्डा यांचा मुलगा हरीश याचा विवाह जयपूरमधले हॉटेल व्यावसायिक रमाकांत शर्मा यांची मुलगी रिद्धी सोबत झाला.