Lock upp Finale: किती किमतीचं बक्षिस ते कोण असणार गेस्ट? जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lock upp Finale: किती किमतीचं बक्षिस ते कोण असणार गेस्ट? जाणून घ्या डिटेल्स

Kangana Ranaut Lock upp Finale details
 कंगना रनौतचा(Kangana Ranaut) हा शो फिनालेच्या खूपच जवळ आला आहे. शो जेव्हा सुरु होणार होता तेव्हा तो लोकांना किती आवडेल याबाबत अनेक अंदाज लावले जात होते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शो नं खूपच कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. कितीतरी रेकॉर्ड या शो नं आपल्या नावावर केले आहेत. आशा आहे की आता शो चा फिनाले ही तितकाच हीट ठरेल.

'लॉकअप' च्या Badass फिनालेच्या आधी जाणून घ्या शो संबंधीत सर्व डिटेल्स,म्हणजे सर्व अपडेट घेतल्यानंतर तुम्ही या शो चा फिनाले अधिक एन्जॉय कराल.

'लॉकअप' चा ग्रॅंड फिनाले शनिवारी ७ मे रोजी होणार आहे. फिनालेची वेळ रात्री १०.३० वाजताची आहे. ALT Balaji आणि Mx Player वर हा फिनाले  स्ट्रीम केला जाईल. फिनालेमध्ये कंगना रनौत आपल्या तडफदार सूत्रसंचालनानं शो ला चारचॉंद लावेल एवढं नक्की.

फिनालेला अधिक एंटरटेनिंग बनवण्यासाठी पूर्ण तयारी केली गेली आहे. शो मधून बाहेर पडलेले कंटेस्टंट्स आणि फायनलिस्ट यावेळी स्पेशल परफॉर्मन्सेस देणार आहेत. ग्रॅंड फिनाले वीक मध्ये तेजस्वी प्रकाशने वॉर्डन बनून जेलर करण कुंद्राची साथ द्यायला एन्ट्री केली आहे.  TejRan च्या चाहत्यांसाठी ही मोठी ट्रीट आहे. कंगना शो च्या फिनाले मध्ये आपल्या आगामी 'धाकड' सिनेमाचं प्रमोशन करणार आहे. शो मध्ये रॅपर बादशहा गेस्ट बनून येणार आहे.

सगळ्याच कैद्यामंध्ये फिनालेमध्ये एन्ट्री करण्यासाठी मोठे वाद आणि कॉंटे की टक्कर झालेली आपण पाहिलीच असेल. ज्या कंटेस्टंट्सना फिनालेचं तिकीट मिळालं त्यामध्ये प्रिंस नरूला,मुनव्वर फारुकी, शिवम शर्मा, अज्मा फल्लाह, पायल रोहातगी,अंजली अरोरा यांचा समावेश आहे. बातमी आहे की सायशा शिंदे फिनालेच्या अगदी जवळ येऊन शो च्या बाहेर पडली आहे.

'लॉकअप' मध्ये टी.व्ही इंडस्ट्रीतील अनेकांनी अत्याचारी खेळ खेळला. यामध्ये एक कैदी आहे जो सुरुवातीपासूनच सर्वांवर भारी पडला. आम्ही बोलत आहोत मुनव्वर फारुकी संदर्भात. स्टॅंडअप कॉमेडियन मुनव्वर शो चा सगळ्यात दमदार कैदी ठरला. शो पाहणाऱ्यांनी फिनालेआधीच मुनव्वरला शो चा विनर म्हणून घोषित केलं आहे.

प्रिस नरुला हा रिअॅलिटी शोज चा बादशहा म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत तो ४ रिअॅलिटी शो जिंकलेला आहे. त्यामुळे हा शो देखील तो जिंकेल असं म्हटलं जात आहे. फिनालेच्या ट्रॉफीसाठी प्रिन्स आणि मुनव्वर मध्ये कॉंटे की टक्कर पहायला मिळेल.

हा 'लॉकअप' चा पहिलाच सिझन आहे. पण तरिही तो हिट ठरला आहे. शो चं बक्षिस किती लाखांचं असेल यावरनं चर्चा रंगली असताना आता किंमत कळत आहे २५ लाख रुपये एवढी. अद्याप अधिकृतरित्या याच्या डिटेल्स मात्र शेअर करण्यात आलेल्या नाहीत.

go to top