sakal

बोलून बातमी शोधा

कंगना राणावतच्या 'लॉकअप'मध्ये कैदी बनण्यासाठी स्टार्स घेतात 'इतकी' रक्कम

Kangana Ranaut

कंगना राणावत (Kangana Ranaut)नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयाने प्रकाशझोतात येत असते. आताही तिने सुरु केलेला रिअॅलिटी शो 'लॉकअप' (Lockup) प्रीमियर झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनला आहे. या शोमध्ये सहभागी झालेले एकमेकांवर भारी पडत आहेत. कंगनाच्या लाॅकमध्ये राहण्यासाठी अनेक अभिनेते, अभिनेत्री,सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सहभागी होण्यास उत्सुक आहेत. त्याचबरोबर लाॅकमध्ये राहण्यासाठी हे स्टार भरमसाठ फी देखील आकारत आहेत. सध्या लाॅकमध्ये असणारे स्पर्धक किती पैसे घेतात हे जाणून घेऊया.

टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा या शोमधून चांगली रक्कम घेत आहे. दर आठवड्याला तो दोन लाख रुपये घेतो.

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांना दर आठवड्याला सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये जातात.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोरा सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक फी आकारत आहे. ती आठवड्याला सुमारे तीन ते चार लाख रुपये घेते.

'लॉकअप'च्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री पूनम पांडे खूप चर्चेत आहे. ती दर आठवड्याला सुमारे तीन लाख रुपये फी घेत आहे.

अभिनेत्री निशा रावल काही दिवसांपूर्वी पती करण मेहरासोबत झालेल्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या शोसाठी ती दर आठवड्याला सुमारे दीड ते दोन लाख रुपये घेत आहे.

या शोसाठी अभिनेत्री पायल रोहतगीला दर आठवड्याला तीन लाख रुपये मानधन दिले जात आहे.

'बिदाई'मधून आपली जबरदस्त ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सारा खानला दर आठवड्याला अडीच ते तीन लाख रुपये मानधन मिळत आहे.