Kitchen Hacks | पराठे मऊ राहावेत असं वाटतंय? या ट्रिक्स करा फॉलो
प्रत्येकजण खाण्याचे शौकीन असतातच. त्यात चमचमीत पदार्थ आणि रुचकर जेवण असेल तर विचारच करायला नको. ते पदार्थ कधी एकदा खातो असे होते. परंतु काही पदार्थ थंड झाले की ते चव देत नाहीत. गरमागरमच त्या पदार्थाची चव चाखायला आनंद मिळतो. त्यातीलच एक प्रत्येकाच्या घरात बनवला जाणारा पदार्थ म्हणचे पराठा. गरम मऊ थर असलेले पराठे कोणत्याही व्यक्तीची भूक वाढवू शकतात. पण पराठा बनवल्यानंतर काही वेळाने तो थंड होऊन कडक होतो, मग खाण्याची सगळी मजाच किरकोळ होऊन जाते. जर तुम्ही पण या समस्येने त्रस्त असाल की काही वेळाने पराठा बनवल्यानंतर तो कोरडा आणि कडक होत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे पराठे सहज मऊ होऊ शकतात.
तूप: पराठ्यासाठी पीठ मळताना त्यात तूप आणि मीठ वापरा. दुसरीकडे पीठ जास्त प्रमाणात असल्यास त्यात थोडे वितळलेले तूप टाका, तूप जास्त गरम नसावे. आता पाण्याच्या मदतीने पीठ मळून घ्या.
बेकिंग सोडा: मऊ पराठे बनवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. बेकिंग सोडा मिसळून पीठ मळून घ्या आणि नंतर 10 मिनिटे झाकून ठेवा.
दही: जर तुम्हाला हवं असेल तर पीठ मळताना तुम्ही मीठ आणि तूप व्यतिरिक्त दही देखील वापरू शकता. लक्षात ठेवा की दही नेहमी ताजे वापरावे. पूर्ण पीठ मळून झाल्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे राहू द्या. त्यामुळे पराठे मऊ होतात.
पराठे बनवताना ही गोष्ट लक्षात ठेवा: पराठ्याचे थर बनवताना सर्वप्रथम पीठ रोटीच्या आकारात लाटून घ्या. त्यानंतर प्रत्येक थरात चांगले तूप किंवा तेल लावा आणि पराठा लाटून घ्या. फक्त मंद आचेवर शिजवा. असे केल्याने पराठा परिपूर्ण आणि मऊ होईल.