Mannant : सैर शाहरूखच्या आलीशान बंगल्याची, बघा आतून कसं दिसतं
बॉलीवूडमधे जेवढी चर्चा शाहरूखच्या चित्रपटांची चालते तेवढीच चर्चा त्याच्या आलीशान घराचीसुद्धा सोशल मीडियावर होताना दिसून येते. गूगल सर्चमधे सर्वाधिक कोणाचे घर सर्च केल्या जात असेल तर ते आहे शाहरूखचे घर ज्याचे नाव आहे 'मन्नात'.
RK चे मन्नत घर भव्यपणे सजवलेले असून त्याच्या घराच्या बाजूला सुंदर बाग आहे. शाहरुख खानच्या बंगल्यात निओ-क्लासिकल घटकांचा प्रभाव आहे, तर घराचे आतील भाग अतिशय आधुनिक आणि स्टायलिश आहेत. चला तर शाहरूखचे घर आतून दिसते कसे ते आपण जाणून घेऊया.
शाहरुख खानची 2022 ची संपत्ती 6000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. शाहरुख खानची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे, यात काही वादच नाही की ‘मन्नत हाऊस’ इंटरनेटवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या घरांपैकी एक आहे कारण लोकांना किंग साइज मन्नत एसआरके घराबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे.
'मन्नत हाऊस' हे शाहरुख खानच्या मुंबईतील घराचे नाव आहे. हे सहा मजली विस्तीर्ण शाहरुख खानचे निवासस्थान आहे जे विंटेज आणि समकालीन डिझाइन दोन्हींचे काँबिनेशन आहे. मन्नत घराची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. शाहरुख खानचे घर मन्नतची किंमत 200 कोटी रुपये आहे आणि खुद्द शाहरुख खानने मन्नत घर ही त्याची सर्वात महाग खरेदी असल्याचे सांगितले आहे.
पण, तुम्हाला माहित आहे का की शाहरुख खानच्या आधी मन्नतला सलमान खानला विक्रीसाठी ऑफर करण्यात आले होते. एका मुलाखतीत सलमान खानने नमूद केले की, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘मन्नत घर’ त्याच्याकडे खरेदीसाठी आले होते आणि त्याच्या वडिलांनी त्याला एवढे मोठे घर खरेदी करण्यापासून रोखले होते.
SRK च्या घराचे नेमप्लेटसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असते. गौरी खान ही स्वत: इंटेरीयर डिझायनर असल्याने ती घरात वेगवेगळे चेंजेस करत असते.
पूर्वी, शाहरुख खानच्या मन्नतच्या घराला एक नवीन रेडियम नेम प्लेट मिळाली होती जी संध्याकाळी चमकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार मन्नत घरातील नेम प्लेट शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांनी डिझाइन केली आहे, त्यात हिरा जडलेला आहे आणि त्याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. मात्र, महिनाभऱ्यानंतर हे हटवून मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण सुरू करण्यात आले.
शाहरूखच्या घरातील विविध कॉर्नरहून काढले गेलेले फोटोज बघत अनेकजण त्यांच्या घराच्या इंटेरीयरसाठी प्रेरणा घेतात. शाहरूच्या घराचं इंटेरीयर मात्र फार महागाचं आहे.