Love Story: मुस्लिम तरुणीसोबत लग्नासाठी शिवम दुबेने केलेलं मोठं धाडस

धडाकेबाज खेळीमुळे चर्चेत असणाऱ्या शिवम दुबेच्या प्रेमकहाणीची रंगली चर्चा
Love Story: मुस्लिम तरुणीसोबत लग्नासाठी शिवम दुबेने केलेलं मोठं धाडस
esakal
Updated on

यंदाच्या आयपीएल सीझन १५ मध्ये धडाकेबाज खेळीमुळे शिवम दुबे चर्चेत होता. दरम्यान सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे क्रिकेट जगतात चर्चेत आला आहे. त्याची प्रेमकहाणी सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

शिवम दुबे जुलै 2021 मध्ये गर्लफ्रेण्ड अंजुम खानसोबत हिंदू-मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकला.

शिवम दुबेने जुलै 2021 मध्ये गर्लफ्रेण्ड अंजुम खानसोबत लग्न केले. शिवम दुबे आणि अंजुम यांचे लग्न मुंबईत झाले होते. शिवम दुबेने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

लग्नाचे फोटो शेअर करताना शिवम दुबेने, 'आम्ही केलेले प्रेम हे प्रेमापेक्षा जास्त होते. आणि आता आमचे जीवन सुरू झाले, नुकतेच लग्न १६-०७-२०२१. ' अशी कॅप्शन दिली आहे.

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ही उत्तर प्रदेशची आहे आणि तिने अलीगड मुस्लिम विद्यापीठातून (एएमयू) फाईन आर्ट्स शाखेत पदवी मिळवली आहे. त्याच वेळी, शिवम दुबे मुंबईत लहानाचा मोठा झाला आणि त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला उंचीवर नेले.

अंजुम खानला अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये खूप रस आहे. हिंदी मालिकांव्यतिरिक्त तिने म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे. अंजुम खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

आयपीएल १५ व्या सीझनच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये शिवम बाप बनला.

शिवम दुबेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शिवम दुबेने भारताकडून आतापर्यंत 13 टी-20 आणि एक वनडे खेळला आहे. या अष्टपैलू खेळाडूच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 105 धावा आणि 5 विकेट्सची नोंद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com