sakal

बोलून बातमी शोधा

नागांचं गाव माहितीय? इथं गावातल्या प्रत्येक चिमुरड्याच्या गळ्यात दिसतो 'साप'

Shetphal is snake village in Solapur district
आज महाशिवरात्री (Mahashivratri) आहे. हा दिवस शिवभक्तांसाठी खास असतो. भोलेनाथाची कल्पना येताच, हातात त्रिशूळ आणि गळ्यात नाग गुंडाळलेल्या महादेवाचं चित्र डोळ्यासमोर येतं. देशात सापांविषयी लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, परंतु महाराष्ट्राच्या (Maharastra) सोलापूर जिल्ह्यातील एक शेटफळ (Shetphal) गाव आहे, जिथं साप हा गावकऱ्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या गावात कोब्रासह अनेक प्रकारचे साप आहेत. शेटफळमध्ये लहान मुलंही सापांसोबत खेळताना दिसतील. चला तर जाणून घेऊया या गावाविषयी..

महाराष्ट्राच्या सोलापूर (Solapur) जिह्यातील ‘शेटफळ नागोबाचे’ या नावाचं माढा तालुक्यात वसलेलं एक छोटसं खेडं. 2000 च्या आसपास लोकांची वस्ती असलेल्या ह्या गावात प्रत्येक घरात कोब्रासदृश्य सापांचं वास्तव्य आहे.

शेटफळ हे सर्पप्रेमींचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या या गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळं येथील लोक सापांच्या मदतीनं आपला उदरनिर्वाह करतात. हेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. त्यामुळं इथं तुम्हाला घरोघरी साप दिसतील.

शेटफळ गावाचा इतिहास हा काहीसा वेगळा आहे. इथल्या प्रत्येक घरात सापाला पाळीव प्राणी म्हणून स्थान दिलं गेलंय. गावाला या सापांच्या रुपात महादेवाचा आशिर्वाद लाभला आहे, असं लोक मानतात. गावातल्या प्रत्येक घरातील एक कोपरा हा सापांसाठी राखीव असतो, ज्याला ‘देवस्थान’ असंच म्हटलं जातं.

आता साप म्हणजे काही एका जागी बसून राहणारी प्रजाती नाही. त्यामुळं इथं सापांना घरातून बाहेर येण्या-जाण्यासाठी भिंतीचा एक भाग पोकळ केलेला दिसून येतो. त्यांच्या इच्छेनुसार ते तिथं कधीही येऊ-जाऊ शकतील, अशी इथं सोय करून ठेवलीय. TOI च्या रिपोर्टनुसार, शेटफळ गाव पुण्यापासून 200 किमी अंतरावर आहे.

अहवालानुसार, या गावातील मुलं सापांना अजिबात घाबरत नाहीत, कारण ते फक्त सापांमध्येच वावरतात. यामुळंच गावात अनेकदा गळ्यात साप घातलेली लहान मुलं तुम्हाला दिसतील. या गावात गेल्यावर साप चावतील, असं बहुतेकांना वाटतं; पण काहीच तसं नाही. आजपर्यंत इथं असं एकही प्रकरण समोर आलेलं नाही.

लोकांच्या सानिध्यात राहणारे साप आणि सापांच्या सोबत आनंदानं राहणारी लोकं बघण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. आणि वेळ काढून ह्या गावाला आवर्जुन भेट देतात.