Photo : रेशीमगाठ जुळलीच.. नेहा यशच्या लग्नाचे हे खास फोटो तुमच्यासाठी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo : रेशीमगाठ जुळलीच.. नेहा यशच्या लग्नाचे हे खास फोटो तुमच्यासाठी..

majhi tujhi reshimgath neha and yash wedding photo

Majhi tujhi reshimgath : झी मराठी (zee marathi) वरील माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय याने प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेच्या सुरुवातरीपासून प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता जवळ आला आहे. यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे. यासाठी दोन तासांचा विशेष भाग प्रदर्शित होणार असून नेहा यशच्या लग्नाचे खास फोटो खास आपल्यासाठी..

(majhi tujhi reshimgath neha and yash wedding photo)

एखाद्या खऱ्या लग्नासारखेच नेहा आणि यशचे लग्न सुरू आहे. सर्व विधी आणि सोहळे मोठ्या थाटात पार पडत आहेत.

नेहा आणि यश चे लग्न ही एक मोठी कसरत होती. कारण नेहाला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. अशा परिस्थितीतही यश नेहाचा स्वीकार करतो. अखेर या दोघांच्या प्रेमाची गाडी लग्नापर्यंत आली आहे.

त्यांचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजा मस्ती तर प्रेक्षकांनी पाहिलीच पण आता यश आणि नेहाचा लग्न सोहळा डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने होणार आहे.

या लग्नात नेहा आणि यश हे दृष्ट लागण्याइतके सुंदर दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या नव्वारी साडी मध्ये नेहाचं सौंदर्य अगदी खुलून आलंय तर यश नवरदेवाच्या पोशाखात एकदम राजबिंडा दिसतोय. पण या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे चिमुकली परी. तिच्या घेरदार शरारामध्ये परी खूपच गोड दिसतेय. हा दिमाखदार लग्नसोहळा प्रेक्षकांना १२ जून रविवारी रात्री ८ वाजता २ तासांचा विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

go to top