Photo : प्रेक्षकांच्या टीकेनंतरही 'रानबाजार' हीट.. अशी झाली सक्सेस पार्टी..

‘रानबाजार’ वेब सिरिजची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी झाली यावेळी अनेक तारे तारकांनी हजेरी लावली होती.
marathi web series ranbazar success party photo
marathi web series ranbazar success party photosakal
Updated on

ranbazar success party : वेबविश्वाला हादरून सोडणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली. सुरवातीला या वेब सिरिज वर टीका झाली पण नंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘रानबाजार’ला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले. टिझर बघून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांनी वेबसीरिज पाहून, त्याचे भरभरून कौतुक केले. अशा या वेबसीरिजने आपल्या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले. (marathi web series ranbazar success party photo)

'रानबाजार' हीट झालीच शिवाय  पार्टीमागे एक खास कारणही होते. ते म्हणजे    ‘रानबाजार’चे निर्माते आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही पार्टी ठेवण्यात आली होती.
'रानबाजार' हीट झालीच शिवाय पार्टीमागे एक खास कारणही होते. ते म्हणजे ‘रानबाजार’चे निर्माते आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही पार्टी ठेवण्यात आली होती. sakal
  या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.
या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.sakal
'रानबाजार'चे निर्माते अक्षर बर्दापूरकर आणि लेखक दिग्दर्शक अभिजीत पानसे.
'रानबाजार'चे निर्माते अक्षर बर्दापूरकर आणि लेखक दिग्दर्शक अभिजीत पानसे. sakal
अभिनेते सचिन खेडेकरही या पार्टीला उपस्थित होते. त्यांनीही यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका केली आहे.
अभिनेते सचिन खेडेकरही या पार्टीला उपस्थित होते. त्यांनीही यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका केली आहे. sakal
या वेब सिरिजच्या प्रोमो नंतर 
अभिनेत्री प्राजक्ता माळी वर झालेली टीका आपल्याला ठाऊक आहेच. पण नंतर तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. ती देखील या सोहळ्याचा भाग झाली होती.
या वेब सिरिजच्या प्रोमो नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी वर झालेली टीका आपल्याला ठाऊक आहेच. पण नंतर तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. ती देखील या सोहळ्याचा भाग झाली होती. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com