sakal

बोलून बातमी शोधा

Marbat Photo : नागपूर शहरात मारबत निघण्यामागील परंपरा काय? फोटोंमधून जाणून घ्या...

Marbat Photo Latest News

Marbat Photo Latest News नागपूर : इंग्रज शासनाच्या अत्याचारास जनता कंटाळल्याने इंग्रजांना कसे हाकलावे या विचारात सर्वजण होते. जनतेला जागृत करण्यास कायदेशीर बंदी होती. मात्र, धार्मिक कार्यास थोडीफार मुभा असल्याने त्याचा फायदा घेऊन तऱ्हाणे तेली समाजातील थोर रहिवासी यांनी समाजातील लोकांना एकत्रित करण्याचे व समाज बांधणीचे कार्य करून मारबत उत्सवाचे कार्य सुरू करून इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. लढा देणे हे फार कठीण होते. परंतु, त्यात धार्मिक उद्देशाने एकत्रित करण्यासाठी थोडीशी कायद्यात मुभा होती. या संधीचा फायदा घेऊन धार्मिक स्वरूप निर्माण करण्यास श्री भगवान कृष्णाची मावशी पुतणा राक्षसीने भगवान कृष्णाचा वध करायचा प्रयत्न केला होता. या शास्त्रोक्त घटनेचा आधार घेऊन मारबत उत्सवाची स्थापना पोळ्याच्या दिवशी वर्ष १८८५ पासून समाजाने केली. (छायाचित्र - प्रतीक बारसागडे)

जागनाथ बुधवारी, नागोबा देवी देवस्थान तऱ्हाणे तेली समाजाच्या वतीने परंपरेनुसार काढण्यात येणारी पिवळी मारबत.

शास्त्रोक्त घटनेचा आधार घेऊन मारबत उत्सवाची स्थापना पोळ्याच्या दिवशी वर्ष १८८५ पासून समाजाने केली.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला काळी व पिवळी मारबतीसह शहरात बडग्याचीही मिरवणूक काढण्यात येते.

शहराच्या संस्कृतीचे प्रतीक ठरलेला मारबत उत्सवाचा यंदा नागपूरकरांंना आनंद लुटता आला. कोरोनामुळे मागील दोन वर्षे हे शक्य झाले नाही.

देशातील मार्बत मिरवणुकीच्या वेगळेपणासाठी नागपूर हे शहर ओळखले जाते.

मारबत उत्सव म्हणजे नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे.

या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे (मोठे पुतले) तयार केले जातात.

पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

ब्रिटीश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणेतेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीचा स्थापना केली. ती परंपरा आजही सुरू आहे.

टॅग्स :Pola Festivalmarbat