sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup 2022 Fastest Ball : वेगाच्या 'वेडे'पणात कोण आहे आघाडीवर?

Mark Wood Leading The List Of fastest deliveries In T20 World Cup 2022 Super 12

T20 World Cup 2022 Fastest Deliveries : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे वेगवान गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेगवान चेंडू टाकण्यात इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड आणि न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनमध्ये चांगलीच चुरस पहावयास मिळत आहे. दोघेही 154 किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज ठरवण्यासाठी मोठी घासाघीस सुरू आहे.

सध्या तरी टी 20 वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून इंग्लंडला मार्क वूड आघाडीवर आहे. त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सला 154.74 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला होता.

यानंतर न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन या यादीत 154.55 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने हा चेंडू आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात कर्णधार अॅड्र्यू बालबिर्नेला टाकला होता.

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील तिसरा सर्वात वेगवान चेंडू मार्क वूडने टाकला. त्याने अफगाणिस्तानविरूद्ध हजरतुल्ला झजाईला 154.48 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला होता.

यादीतला चौथा सर्वात वेगवान चेंडू देखील मार्क वूडच्याच नावावर आहे. त्याने अफगाणिस्तानविरूद्धच 154.48 किमी वेगाने चेंडू टकला होता.

एन्रिच नॉर्त्जेने बांगलादेशविरूद्ध शाकिब अल हसनला 154.31 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला होता. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील पाचवा सर्वात वेगवान चेंडू ठरला.