आमदार रोहित पवार निघाले बिबट्याच्या मागावर

Friday, 11 December 2020

अहमदनगर : बिबट्यामुळे नगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर दिवसा उजेडीही शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यातच सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. हा नरभक्षक बिबट्या अजून सापडलेला नाही. त्याला गोळी घालून ठार करण्याचा आदेश निघाला आहे. शार्प शूटरही त्यासाठी वन वन विभागाने तैनात केले आहेत.

दोन्ही जिल्ह्यातील लोकांना दिलासा मिळावा यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार रात्रीही गस्त घालीत आहेत. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मोहिमेत सहभागी होत मनोधैर्य वाढवले. तिन्ही जिल्ह्यातील बिबटे लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी होत आहे. दरम्यानच्या काळात रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी, अशी निवेदनेही दिली जात आहेत.