Photo Story: सुर्योदयाचा आनंद घेण्यासाठी भारतातील बेस्ट 8 ठिकाणं | Famous Sunrise Points in India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Famous Sunrise Points in India: सुर्योदयाचा आनंद घेण्यासाठी भारतातील बेस्ट 8 ठिकाणं

Famous Sunrise Points in India

Famous Sunrise Points in India: उगवत्या सुर्यासोबत नव्या दिवसाची सुरुवात होते. उगवणारा सूर्य अनेक प्रेरणादायी असतो आणि उगवत्या सुर्योदयामुळे शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. उगवता सूर्य पाहणे हा एक सुंदर अनुभव असतो. तसं पाहायलं गेलं तर आपण घराच्या बाल्कनीतून तसेच खिडकीतून सूर्योदय पाहू शकतो. परंतु जर तुम्ही उगवता सूर्य पाहण्यासाठी कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथून सूर्योदयाचे विहंगम दृश्य पाहता येते. चला जाणून घेऊया भारतातील अशा प्रसिद्ध सनराईज पॉइंट्सबद्दल...

1. टायगर हिल्स, दार्जिलिंग - एव्हरेस्ट नंतर हिमालयातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेल्या कांगचेनजुंगाच्या टेकड्यांमधून उगवणारे सूर्याचे दर्शन तुमच्या आठवणींमध्ये कायमचे कोरले जाईल.

2. कोवलम, केरळ - केरळ किनारपट्टीवरील शहर, कोवलम हे सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. विशेषतः उगवत्या सूर्याचे दृश्य पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येत असतात.

3. माउंट अबू, राजस्थान - माउंट अबू येथील प्रसिद्ध नक्की तलावावरून सूर्य उगवताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.

4. ताजमहाल, आग्रा - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल येथून सूर्य उगवण्याचा आणि मावळण्याचा देखावा काही औरच असतो.

5.वाराणसी, यूपी - वाराणसीच्या घाटांच्या मध्यभागी उगवणारा सूर्य पाहणे हे एक सुंदर ठरू शकतो.

6. नंदी हिल्स, कर्नाटक - बेंगळुरूजवळ स्थित नंदी हिल्स त्याच्या सनराईज पॉइंटसाठी देखील प्रसिद्ध आहे. दूरदूरवरून लोक येथे सूर्योदयाचा आनंद लुटण्यासाठी येतात.

7. पुरी, ओरिसा - पुरीचा समुद्र देखील भारतातील सूर्योदयाच्या दृश्यासाठी एक योग्य ठिकाण आहे. याशिवाय भारतातील पहिले आणि जगातील दुसरे सर्वात मोठे सरोवर चिल्का तलाव येथे देखील सूर्योदयाचे विहंगम दृश्य अनुभवता येते.

8. मरीन ड्राइव्ह, कोची - कोचीच्या मरिन ड्राइव्हचा सूर्योदय सर्वांना मंत्रमुग्ध करतो. येथे दिसणारा सूर्योदयाचा नजारा तुम्हाला निसर्गाच्या जवळचा अनुभव देईल.

टॅग्स :sunTourism
go to top