आज वेब सिरिजचा काळ असला तरी मराठी मालिका हा प्रत्येक घरातील जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या काही वर्षात मालिका विश्वात नवोदित अभिनेत्रींच्या पदर्पणचा प्रमाण वाढल आहे. विशेष म्हणजे पहिल्याच मालिकेनंतर या नायिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. यामध्ये विशेष करून अभिनेत्री शिवानी बावकर, शिवानी सोनार, अक्षया नाईक, विदुला चौगुले, श्वेताराजन, अनुष्का सरकटे या अभिनेत्रींचा समावेश आहे. पाहूया या अभिनेत्रींचा प्रवास.. (most favourite actress in marathi serial)
झी मराठी वरील 'लागीर झालं जी' ही शिवानी बावकर ची पहिली मालिका. ग्रामीण बाज असलेल्या या मालिकेत एका सैनिकावर प्रेम करणाऱ्या मुलीची कथा रंगवली होती. ही मालिका झी मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. या मालिकेनंतर शिवानीला अनेक मालिका आणि चित्रपटांच्या अनेक ऑफर आल्या. सध्या ती सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. (shivani baokar)
शिवानी सोनार म्हणजे घराघरात पोहोचलेली कलर्स मराठी वाहिनीवरील 'आडगी संजू' . या मालिकेत शिवनी संजीवनी ढाले पाटील याभूमिकेत आहे., तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेतच पण तिच्या ग्रामीण भाषाशैलीने आणि अभिनयाने ती अधिक चर्चेत आहे. शिवानीची एक मालिका सुरु असतानाच तिला इतरही मालिकांसाठी विचारणा होत असल्याची चर्चा आहे. (shivani sonar)
झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'मन झालं बाजींद'मधील नायिका कृष्णा म्हणजेच अभिनेत्री 'श्वेता खरात' ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. श्वेता राजन या नावाने ती ओळखली जाते. या आधी तिने 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत 'मोना'हे पात्र साकारले होते. (shweta kharat)
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' हि मालिका शरीराने लठ्ठ असणाऱ्या मुलीची व्यथा मांडणारी मालिका आहे. लठ्ठ मुलीच्या लग्नात येणाऱ्या अडचणी आणि आणि संघर्ष या दाखवला आहे. ही मालिका चालेल का याबाबत अनेकांना शंका होती. पण मराठीतील लोकप्रिय मालिकांमध्ये सध्या या मालिकेचा समावेश आहे. यात लतिका म्हणजे लठ्ठ मुलीची भूमिका साकारणाऱ्या 'अक्षया नाईक'ने चाहत्यांना वेडं केलं आहे. तिचा अभिनय आणि नाशिकच्या बोलीभाषेला तिने दिलेले प्राधान्य याचे विशेष कौतुक केले जात आहेत. (akshya naik)
'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले. मालिकेत सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली. विदुलाच्या ऊंची वरून तिला बरंच ट्रॉल केलं गेलं पण नंतर याच विदुलाने महाराष्ट्राला वेड लावलं. (vidula chaugule)
'कारभारी लय भारी' या ‘झी मराठी’वरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का सरकटे. या आधी तिने 'लक्ष्मीनारायण' मालिकेत लक्ष्मी मातेची भूमिका साकारली होती. अनुष्काने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच चाहत्यांचे मन जिंकले. (anushka sarkate)
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.