अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचा ऑफिशियल ह्युमन्स ऑफ बाॅम्बेने इन्स्टाग्रामवर छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. यात मृणालचे लहानपणापासून आतापर्यंतचे काही निवडक छायाचित्रे त्यात घेण्यात आले आहेत. शेवटी ती डान्स करताना दिसत आहे. मला डेंटिस्ट व्हायचे होते. पण थ्री इडियट्स पाहिल्यानंतर माझा विचार बदलला. मी वडिलांना बोलले, मला अभिनय करायचे आहे. ते आश्चर्य चकित झाले. त्यांनी मला विचारले, तुला खात्री आहे ना ? त्याला मी उत्तर दिले. त्यामुळे मी खूश झाले होते. त्यांनी मला आशीर्वाद दिला होता.
मी जेव्हा महाविद्यालयात होते, तेव्हापासून ऑडिशन द्यायला सुरु केले. खूप मेहनतीनंतर मला एका टीव्ही मालिकेत काम मिळाले. मालिका दररोज साडेसात वाजता प्रसारित व्हायची. मी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे मला पहिला चित्रपट मिळाला.
मृणाल ठाकूरचा लहानपणाचा फोटो
मृणाल ठाकूर
माझा पहिला चित्रपट लव्ह सोनिया. यातून मला बाॅलीवूडचे तिकिट मिळाले. मी टीव्ही उद्योग सोडला. मात्र काही काळाने मी बेरोजगार झाले. मी रडले. वडिलांना याबद्दल सांगितले. तुझ्या टॅलेंटवर विश्वास ठेव असे त्यांनी मला सांगितले.
तुझ्या टॅलेंटवर विश्वास ठेव असे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे सुपर ३० च्या ऑडिशनला गेले. अकरा महिने गेले. त्यानंतर माझी सुपर ३० चित्रपटासाठी निवड झाली. मी हृतिक रोशनबरोबर काम केले. शेवटी सुपर ३० मधून मला ओळख मिळाली. मृणाल ठाकूर कोण हे लोकांना माहित होऊ लागले.
त्यानंतर तुफान आणि जर्सी. गेल्या कित्येक वर्षांपासून पडद्यावर शाहीद कपूरला पाहतेय. मात्र त्याच्या बरोबर मला काम करायला मिळेल यावर माझा विश्वासच बसत नाही. मात्र माझ्या प्रवासातून मुलींना प्रेरणा मिळेल. आपल्या स्वप्नांचा पिच्छा कधी सोडायचे नाही.
माझी इच्छा आहे, की एक दिवस माझ्या आयडाॅल मेरिल स्ट्रिपबरोबर काम करायला मिळेल. जर वडिलांनी मला सुरुवातीला नाही म्हटले असते तर काय घडले असते? मात्र मला जे आवडतय ते मी निवडू शकले नसते. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी वेगळं काहीतरी करु शकले, असं तिने ऑफिशियल ह्युमन्स ऑफ बाॅम्बेला सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.