Long March Photos: लाल वादळाची विधान भवनाकडे वाटचाल; जाणून घ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
Nashik : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. आपल्या प्रमुख मागण्या शासनापुढे मांडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक ते मुंबई अशा शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्चला सुरुवात झाली आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वात हा लाँग मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या लाँग मार्चमध्ये सहभाग घेतला असून लाल रंगांने रस्ता रंगला तर घोषणांनी दुमदुमला. पाहुया याची क्षणचित्रे अन् शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या...
लाँग मार्चच्या काही मागण्या ० शेतीसाठी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून शेतकऱ्यांची थकीत वीजबिले माफ करावीत ० शेतीविषयक संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा
० अवकाळी पावसाने व वर्षभर सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची ‘एनडीआरएफ’मधून तत्काळ भरपाई द्यावी ० पीकविमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीक विमाधारकांना नुकसानभरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडावे
० बाळ हिरडाला किलोला किमान २५० रुपये हमीभाव देऊन हिरड्याची सरकारी खरेदी योजना सुरू ठेवावी ० २०२०च्या निसर्ग चक्रीवादळी पावसात हिरडा पिकाच्या नुकसानीच्या झालेल्या पंचानाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ० सोयाबीन, कापूस, तूर, हरभऱ्याचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबवावे
० २०२०च्या निसर्ग चक्रीवादळी पावसात हिरडा पिकाच्या नुकसानीच्या झालेल्या पंचानाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ० सोयाबीन, कापूस, तूर, हरभऱ्याचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबवावे ० महामार्गबाधित शेतकऱ्यांना केरळच्या धर्तीवर मोबदला मिळावा. पुनर्वसन करावे. नवी मुंबई तळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे
० गायीच्या दुधाला ४७ आणि म्हशीच्या दुधाला ६७ रुपये लिटर भाव मिळावा. मिल्कोमीटर निरीक्षकांची नियुक्ती करावी ० दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे ० २००५ नंतर भरती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मंजूर करावे.
आल्या मागण्या शासनापुढे मांडण्यासाठी जेष्ठांनी देखील यात सहभाग घेतला आहे.