स्वत:ला रिलॅक्स करायचंय... या सहा गोष्टी फॉलो करा

sleep girl.jpg
sleep girl.jpg
Updated on

आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी दररोज खूप मेहनत करतो. या काळात रात्री आपण 8 तासांची झोप घेतो. पण फक्त 8 तासांची झोप घेऊन शरीराला आराम मिळत नाही, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. शरीराला रिलॅक्स करण्यासाठी झोपेव्यतिरिक्त विश्रांतीचे इतर प्रकार आहेत. ज्याकडे आपण लक्ष देऊन तसे वागलो तर आपण हेल्दी आय़ुष्य जगू शकू.

शारिरिक आराम- पुरेशी झोप घेतल्यानंतरही काहीवेळा आपले अंग दुखत असते. शारिरिक थकवा जाणवत असतो. त्यामुळे आपण शारिरिक आरामाकडे लक्ष दिले पाहिजे. शारिरिक विश्रांती निष्क्रिय आणि सक्रिय अशी दोन्ही प्रकारची असू शकते. निष्क्रिय शारिरिक विश्रांती म्हणजे झोपणे किंवा डुलकी घेणे. पण, सक्रीय विश्रांती म्हणजे योग, ध्यान, स्ट्रेचिंग आणि मसाज यासारख्या आरामदायी गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे. या सर्व क्रियांमुळे शरीरातील रक्ताभिसरण, लवचिकता वाढून शरीराला नवसंजीवनी मिळते.

मानसिक आराम -आरोग्यासाठी मानसिक विश्रांती अत्यंत गरजेची आहे. जर एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल, गोष्टी विसरत असेल किंवा ध्यान करण्यासाठी लक्ष देणे कठीण जात असेल, तर त्या व्यक्तीला मानसिक आरामाची गरज असते. रात्री मनात वेगवेगळे विचार घोळत असल्याने पुरेशी झोप होत नाही. हे मानसिक थकव्याचे लक्षण आहे. त्यामुळे अशा लोकांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी ध्यान, योगावर लक्ष देणे गरजेचे आहे.

भावनिक आराम -कधीकधी भावनिकदृष्ट्या आपल्याला कमजोर वाटू शकतं. अशावेळी भावनिक आराम घेणे गरजेचे आहे. भावनिक आराम म्हणजे काय तर आपण आपल्या भावना ज्यांच्याशी शेअर करतो, त्यांच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे. मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवणे.

कामाच्या दरम्यान विश्रांती -
ऑफिसमध्ये तसेच दुकानात काम करताना लोक सतत कामात मग्न असतात. यादरम्यान अनेक लोक बराच वेळ खुर्चीत बसुन कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करत राहतात. अशा लोकांनी कामादरम्यान थोड्यावेळासाठी का होईना छोटा ब्रेक घेऊन आराम करणे गरजेचे आहे. स्क्रीनवरून लक्ष हटवून डोळ्यांना आराम देणे गरजेचे आहे. बराचकाळ गॅझेटच्या संपर्कात राहाणे टाळा. मध्येमध्ये दोन मिनीटांकरता तुमचे डोळे बंद करा.
कामाच्या दरम्यान विश्रांती - ऑफिसमध्ये तसेच दुकानात काम करताना लोक सतत कामात मग्न असतात. यादरम्यान अनेक लोक बराच वेळ खुर्चीत बसुन कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करत राहतात. अशा लोकांनी कामादरम्यान थोड्यावेळासाठी का होईना छोटा ब्रेक घेऊन आराम करणे गरजेचे आहे. स्क्रीनवरून लक्ष हटवून डोळ्यांना आराम देणे गरजेचे आहे. बराचकाळ गॅझेटच्या संपर्कात राहाणे टाळा. मध्येमध्ये दोन मिनीटांकरता तुमचे डोळे बंद करा.
सामाजिक विश्रांती-
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय त्याला एक प्रकारचा एकटेपणा जाणवून नकारात्मक भावना निर्माण होतील. जसा वेळ मिळेल तसा सामाजिक उपक्रमातही भाग घेणे गरजेचे आहे. असे केल्याने सामाजिक सक्रियता वाढेल. नव्या लोकांच्या संपर्कात आल्याने, त्यांच्याशी संवाद साधल्याने जीवनात उत्साह टिकून राहील.
सामाजिक विश्रांती- मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय त्याला एक प्रकारचा एकटेपणा जाणवून नकारात्मक भावना निर्माण होतील. जसा वेळ मिळेल तसा सामाजिक उपक्रमातही भाग घेणे गरजेचे आहे. असे केल्याने सामाजिक सक्रियता वाढेल. नव्या लोकांच्या संपर्कात आल्याने, त्यांच्याशी संवाद साधल्याने जीवनात उत्साह टिकून राहील.
आध्यात्मिक विश्रांती -हा आरामाचा शेवटचा प्रकार असून काही व्यक्तींना त्यांची खूप गरज असते. हा आराम केल्याने तुम्ही शारिरिक, मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम करता. अध्यात्मामुळे मनाला शांती मिळते. जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com