पिंपरी-चिंचवड शहर झाले सुरु....

शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले पिंपरी-चिंचवड शहर खुले झाले आहे. परिणामी शहरातील बाजारपेठा आज (शुक्रवार) पासून गजबजल्याने नागरिकांची वर्दळ वाढली. सराफ दुकानांपासून ते कपड्यांचे दुकान, सायकलींचे दुकान उघडल्याने खरेदीसाठी नागरीकांची गर्दी पहायला मिळाली.तब्बल दोन महिन्यांनंतर नागरिकांनीही घराबाहेर पडत विविध वस्तूंची खरेदी करण्याचा आनंद घेतला. (संतोष हांडे)