PHOTO I राष्ट्रपती भवनात तैलचित्र रेखाटण्याचा सांगलीकराने मिळावला मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती भवनात तैलचित्र रेखाटण्याचा सांगलीकराने मिळावला मान

oil painting in the Rashtrapati Bhavan

सांगली : चित्रकलेचे शिक्षण घेत असताना एक दिवस मनोज सकळे यांना वडिलांचा फोन आला. ‘अरे, तुझ्या या शिक्षणावर खूप खर्च होतोय, तो मला झेपेल, असं वाटत नाही.’ मनोज यांनी, ‘मी काम करून शिकेन,’ अशी वडिलांना ग्वाही दिली. त्यांनी व्यक्तिचित्र रेखाटण्याचे काम सुरू केले. दिवसाकाठी दोनशे रुपये मिळायचे. व्यक्तिचित्र, अर्थात पोट्रेट रेखाटण्यात त्यांचा हातखंडा बनला. तोच त्यांना मोठा सन्मान देऊन गेला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती भवनमध्ये लावण्यासाठीचे अधिकृत तैलचित्र रेखाटण्याचा मान मनोज यांना मिळाला.

मनोज सकळे मूळचे नांद्रे (ता. मिरज) येथील आहेत. त्यांनी पदविका केल्यानंतर पुढील शिक्षण मुंबई सुरू झाले. या दरम्यान युरोपचा अभ्यास दौरा करण्याची संधी मिळाली. पुन्हा प्रदर्शने सुरू केली. जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शने केली. तेथून चित्र खरेदीला प्रतिसाद वाढत गेला. आता ते जैन तत्त्वज्ञानावर आधारित चित्रमालिका बनवत आहेत.

नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होण्याआधी मावळत्या राष्ट्रपतींचे एक तैलचित्र राष्ट्रपती भवनमध्ये लावण्याची परंपरा आहे. ललित कला सेंटरचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी सकळे यांचे प्रोफाईल राष्ट्रपती भवनकडे सादर केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून नमुना म्हणून दोन चित्रे मागवली होती. ती राष्ट्रपती भवनला आवडली.

३ बाय ४ फुटाचे पेंटिंग करायचे होते. माझी कामाची पद्धत पाहून ५ बाय ८ उभे एक आणि पत्नीसोबतचे एक तैलचित्र करण्याची सूचना त्यांनी केली. मी काम सुरू केले आणि आतापर्यंत तीनपैकी दोन चित्रे दिली आहेत. दोन्ही चित्रे ‘ॲक्रेलिक’ कलरमध्ये कॅनव्हासवर केली आहेत.’’

मनोज सकळे म्हणाले, ‘‘पहिले पोट्रेट करण्यासाठी फक्त २३ दिवसांचा वेळ मिळाला. वेळेत काम पूर्ण केले. त्यानंतर कपल पेंटिंगला १४ दिवसांचा वेळ दिला. त्याचे काम सुरू आहे. उभे चित्र आता राष्ट्रपती भवनमध्ये लावले आहे.राष्ट्रपतींचा स्वभाव खूप छान आहे. त्यांनी काही गोष्टी मोकळेपणाने सांगितले.’’