आजच्या चित्रपटांमधे जेथे हिरोच्या अॅक्शन फिल्मसाठी प्रेक्षकांची गर्दी दिसून येते तेच ८०-९० च्या दशकातील सिनेमा बघाल तर तुम्हाला निश्चितच विलनची भूमिका दमदार दिसेल.अशाच एका विलनचा वाढदिवस.होय सिनेमाजगतात विलनची भूमिका अगदी उत्तमरित्या पार पाडणाऱ्या सदाशिव अमरापुरकरचा आज वाढदिवस.त्यांच्या विलनच्या भूमिकांनी बॉलीवुडचे अनेक सिनेमा गाजलेले आहेत.
महाष्ट्रातील ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या सदाशिवला प्रेमाने तात्या म्हणायचे.लहानपणापासूनच या अभिनेत्याला सामाजिक कार्यात रस होता.कोणाला मदत लागली की लगेच हा तात्या मदतीला तयार असायचा.
या अभिनेत्याची मराठी नाटकांपासून त्याच्या कारकिर्दीला सुरूवात झाली होती.जवळ जवळ ५० नाटकांनंतर सदाशिवची हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री झाली.त्यांचा मोठ्या पडद्यावर पहिला चित्रपट आला तो मराठीतला.या चित्रपटात त्यांनी बाळ गंगाधर टिळकची भूमिका साकारली होती.
सदाशिव यांचा पहिला हिंदी चित्रपट होता 'अर्धसत्य'.या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.मोहरे,कालचक्र,फरिश्ते अशा आणखी अनेक चित्रपटांत त्यांनी त्यांच्या भूमिकेची छाप पाडली.
कॉमेडी चित्रपटांमधेही या अभिनेत्याच्या भूमिका उल्लेखनिय होत्या.'आंखें', 'इश्क', 'कुली नंबर 1', 'गुप्त : द हिडेन ट्रुथ', 'जय हिन्द', 'मास्टर', 'हम साथ-साथ हैं' अशा अनेक कॉमेडी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.
या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पडद्यावर आला तो 'धनगरवाडा'.हा चित्रपट २०१५ मधे प्रदर्शित झाला होता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.