PAK vs ENG : इंग्लंडने पाकिस्तानविरूद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधी झालं नाही ते करून दाखवलं
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस संपला त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 506 धावा केल्या. पाकिस्तानला दिवसभरात इंग्लंडचे फक्त 4 फलंदाज बाद करण्यात यश आले.
पहिल्याच दिवशी चार शतके : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही पहिल्याच दिवशी चार शतके झाली नव्हती. हा पराक्रम इंग्लंडच्या फलंदाजांनी करून धावला. जॅक क्राऊली(122), बेन डकेट (107), ऑली पोप (108), आणि हॅरी ब्रुक (101) यांनी पाकिस्तानविरूद्ध पहिल्याच दिवशी पाच शतके ठोकली.
इंग्लंडकडून दुसरे सर्वात वेगवान शतक : इंग्लंडचा संघ अजून टी 20 क्रिकेटमधून बाहेर पडलेला नाही असे वाटते. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्यात दिवशी 101 धावांची तुफानी शतकी खेळी केली. त्याने ही नाबाद खेळी 81 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारात साकारली. इंग्लंडकडून सर्वात वेगवान कसोटी शतक ठोकण्यात आता ब्रुकचा जॉनी बेअरस्टोनंतर दुसरा क्रमांक लोगतो. बेअरस्टोने 77 चेंडूत कसोटी शतक ठोकले होते. ब्रुक 80 चेंडूत शतक ठोकणारा संयुक्तरित्या तिसरा फलंदाज झाला. यापूर्वी ख्रिस गेल आणि सर्फराज अहमदने 80 चेंडूत शतक ठोकले होते.
पहिल्या दिवशी कधीच इतका स्कोर नाही झाला : इंग्लंडने पहिल्या दिवशीच 4 विकेट्स गमावून 506 धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडने 75 षटकातच ही धावसंख्या गाठली. कसोटी क्रिकेटच्या जवळपास 145 वर्षात पहिल्याच दिवसात 500 च्या वर धावा झाल्या नव्हत्या.
सर्वात वेगवान द्विशतकी भागीदारी : जॅक क्राऊली आणि बेन डिकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागादारी रचली. त्यांनी ही भागीदारी 35.4 षटकातच रचली होती. त्यांनी 6.53 च्या सरासरीने धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एवढ्या वेगाने 200 धावांची भागीदारी यापूर्वी झाली नव्हती.
एकाच षटकात सहा चौकार : पाकिस्तानचा फिरकीपटू शकील हा आपला पहिला कसोटी सामना खेळत होता. मात्र हॅरी ब्रुकने त्याला कोणतीही दया माया न दाखवता त्याला एका षटकात सहा चौकार लगावले. कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारे कारनामा करणारा ब्रुक हा पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी ख्रिस गेल, संदीप पाटील (1982) , रामनरेश सारवान (2006) आणि सनथ जयसूर्या (2007) यांनी केला होता.