Happy Birthday; परेश रावल यांची पडद्यावरची हेराफेरी ते खासदारकी, जाणून घ्या प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy Birthday; परेश रावल यांची पडद्यावरची हेराफेरी ते खासदारकी, जाणून घ्या प्रवास

बॉलीवूडच्या जगात आपली वेगळी ओळख जपणारे परेश रावल आज आपला 67 वा वाढदिवास साजरा करत आहेत. अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश यांचा जन्म 30 मे 1955 रोजी झाला. 200 पेक्षा अधिक चित्रपट आणि विनोदी ते खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे परेश यांना खरी ओळख मिळाली ती विनोदी भूमिकांमुळे.

परेश रावल यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९८५ मध्ये अर्जुन या चित्रपटातून केली. मात्र, त्यांनी खरी ओळख १९८६ मध्ये प्रदर्शित झालेली नाम या चित्रपटात मिळाली. त्यानंतर ते अनेक चित्रपटामध्ये दिसले.

नऊ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांच्या खात्यात एक चित्रपट आला, ज्यामुळे ते केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळखले जाऊ लागलं. हा चित्रपट होता 'सरदार'. या चित्रपटात परेश सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत दिसले होते.

अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात परेश रावल नकारात्मक भूमिकेत दिसले होते. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणूनही काम केले आहे. हा फोटो 'दौड' चित्रपटातील आहे ज्यामध्ये तो नकारात्मक भूमिकेत दिसले होते.

कॉमेडी चित्रपटांमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. फिर हेरा फेरी, आवारा पागल दीवाना, दिवाने हुए पागल, हंगामा यांसारख्या विनोदी चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

हंगामा 2 हा चित्रपट कोरोना महामारीमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. लोकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही, पण त्यात त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

हे फोटो महेश भट्ट यांच्या 1998 मध्ये आलेल्या 'तमन्ना' चित्रपटाच्या सेटवरील आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आहे. या चित्रपटात परेश आणि पूजा मुख्य भूमिकेत दिसले होते.

चित्रपटाव्यतिरिक्त परेश यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांना अनेक वेळा पाहिले गेले आहे.

परेश रावल यांनी १९८७ मध्ये स्वरुप संपत यांच्यासोबत लग्नबंधनात अडकलं. स्वरुप यांनी १९७९ मध्ये मिस इंडिया किताब जिंकला आहे.

परश रावल यांनी दोन मुलं आहेत. आदित्या आणि अनिरुद्ध असं त्यांची नावं आहेत. वडिलांप्रमाणे ते दोघांनीही चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एक मुलगा म्हणजेच आदित्या अभिनेता आहे तर, अनिरुद्ध सुल्तान चित्रपटामध्ये डायरेक्टर होता.

go to top