Photo : शिर्डीतील साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

Monday, 16 November 2020

शिर्डी (अहमदनगर) : साईसमाधी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी भल्या पहाटे दर्शनासाठी खुले झाले.

शिर्डी (अहमदनगर) : साईसमाधी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी भल्या पहाटे दर्शनासाठी खुले झाले. भाविकांना साईदर्शनाची, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना भाविकांच्या गर्दीची आस लागली होती. नगरपंचायतीने विद्युत रोषणाई करून आणि ग्रामस्थांनी रांगोळ्या रेखाटून भाविकांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्याचे जाहीर केल्यापासून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यापार्श्वभूमीवर व्यवस्थापनाकडूनही तयारी करण्यात आली होती. सतिश वैजापूरकर यांनी काढलेली येथील छायाचित्रे.

संपादन : अशोक मुरुमकर