Photos: अभिनेत्रीचा अंगावर शहारा आणणारा जीवन प्रवास; सावत्र मुलांनीच केली होती हत्या | Death anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos: अभिनेत्रीचा अंगावर शहारा आणणारा जीवन प्रवास; सावत्र मुलांनीच केली होती हत्या

Priya Rajvansh

प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रिया राजवंश तिच्या सौंदर्यासाठी मनोरंजन विश्वात ओळखली जायची. तिचे फिल्मी करीअर जितके चर्चेत राहले त्यापेक्षाही जास्त तिचे वैयक्तिक आयुष्य गाजले. अभिनेते देव आनंद यांचे बंधू चेतन आनंद (Chetan Anand) यांच्यासह त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होत्या. 27 मार्च 2000 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी प्रिया राजवंश यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. चेतन आनंद यांच्या मुलांना प्रिया राजवंश हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. (photo story: Death anniversary of Priya Rajvansh)

प्रिया राजवंश यांचे मूळ नाव वीरा सुंदर सिंग. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1936 रोजी सिमल्यामध्ये झाला.  वडिलांच्या कामामुळे पुढे त्या लंडनला गेल्या लंडनच्या एका फोटोग्राफरने काढलेला त्यांचा फोटो हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पोहोचला. 1962 मध्ये ठाकूर रणबीर सिंह यांनी प्रिया यांचा फोटो पाहिला. हा फोटो त्यांनी चेतन आनंद यांना दाखवला. प्रिया राजवंश यांचा फोटो पाहून त्यांनी प्रिया यांना हकीकत (Haqeeqat – 1964) सिनेमाची ऑफर दिली.

चेतन आनंद आणि प्रिया यांच्या वयात तब्बल 22 वर्षांचे होते. प्रिया त्यांच्यापेक्षा खूप लहान होती. चेतन आनंद यांच्याच सिनेमात काम करण्याचा प्रियाने निर्णय घेतला होता. चेतन आनंदसुद्धा प्रियाशिवाय दुस-या अभिनेत्रीला सिनेमात घेत नव्हते. प्रिया चेतन यांना स्क्रिप्टिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनच्या कामातसुद्धा मदत करायची. यावरुन लोकांचा अनेकदा चेतन यांचा वाददेखील व्हायचा. एक काळ असा आला, जेव्हा प्रिया आणि चेतन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून लागले होते. 1964 ते 1986 अशी सलग बावीस वर्षे हिंदी सिनेमांमध्ये अभिनय करणा-या प्रियाला लोक चेतन आनंद यांच्या दुस-या पत्नीच्या रुपात बघू लागले होते.

त्यांचे अभिनेते राजकुमार यांच्यासोबत हीर रांझा, हिंदुस्थान की कसम, तसेच हसते जखम, राजेश खन्नासोबतचा कुदरत, देव आनंद सोबतचा साहेब बहादूर असे अनेक चित्रपट गाजले. 1985 मध्ये आलेल्या हाथोंकी लकीरे या चित्रपटानंतर त्या मनोरंजन विश्वापासून दूर गेल्या.

1997 मध्ये चेतन आनंद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चेतन यांच्या मालमत्तेचा काही भाग प्रिया राजवंश यांच्याही वाट्याला आल्या. मात्र यामध्ये चेतन आनंद यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलंही भागीदार होते. यातुन प्रिया राजवंश यांचे चेतन आनंद यांचे पुत्र केतन आनंद आणि विवेक आनंद यांच्याशी वाद होत होते. 27 मार्च 2000 रोजी जुहू भागातील चेतन आनंद यांच्या रुईया पार्क बंगल्यात प्रिया राजवंश यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. चेतन आनंद यांचे पुत्र केतन आनंद आणि विवेक आनंद यांना पोलिसांनी हत्या प्रकरणात अटक केली होती.

go to top