sakal

बोलून बातमी शोधा

Photos : युक्रेनच्या लढवय्याने युरोपियन संसदेतही जिंकली मनं

रशियाने युक्रेवर केलेल्या भीषण हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कि यांनी म्हटले आहे.

आम्ही आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, आम्हाला कोणी तोडू शकणार नाही, आम्ही बलवान असून, आम्ही युक्रेनियन आहोत असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर युरोपीयन संसदेतील सदस्यांनी उभे राहून त्यांच्या या भूमिकेबद्दल जोरदार टाळ्या वाजवत समर्थन दिले.

युरोपियन संसदेत झेलेन्स्की यांनी उपस्थित सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधला, यावेळी त्यांनी केलेल्या विधानांनंतर उपस्थित सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गरजरात त्यांच्या हिमतीला दाद दिली.

युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर संपूर्ण जगातून राष्ट्राध्यक्ष व्होलोमोदीर झेलेन्स्की यांच्या भूमिकेबद्दल चर्चा केली जात आहे. एवढेच नव्हे तर, संकटात नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे झेलेन्स्की असावा असे देखील चर्चा आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर झेलेन्स्की देश सोडून पळाल्याची चर्चा होती, मात्र, आपल्याला लक्ष्य केले तरी मी आणि माझे कुटुंब युक्रेनमध्येच राहणार असल्याचे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे.

रशिया हा दहशतवादी देश असून, आम्ही झुकणार नसून लढणार असल्याचा दृढ निश्चय झेलेन्स्की यांनी यावेळी भाषणादरम्यान सांगितले. त्यानंतर सदस्यांनी टाळ्यांचा कडकडात केला, त्यांच्या या भूमिकेनंतर झेलेन्स्की यांनी मनापासून आभार मानले.