Photos : एव्हरग्रीन गायक किशोर कुमार यांच्या जीवनातील न ऐकलेले किस्से

एकदम मस्त जीवन जगलेल्या या अवलिया कलाकाराच्या जीवनातील काही किस्से तुम्ही कधी ऐकले नसतील तर हे किस्से पाहुयात.
Photos : एव्हरग्रीन गायक किशोर कुमार यांच्या जीवनातील न ऐकलेले किस्से
Updated on
किशोर कुमार बॉलिवूडमधील एक अशी व्यक्ती आहे जिला कधीही विसरलं जाऊ शकत नाही. त्यांचा जादुई आवाज आजही आपल्याला ताजतवानं करुन टाकतो. किशोर कुमारची गाणी केवळ तुमचं मनच जिंकत नाही तर तरुणांमध्ये जोश भरवतात. आजचा तरुण वर्गही किशोर कुमार यांच्या गाण्यांना आपल्या प्लेलिस्टमध्ये स्थान देतो. एकदम मस्त जीवन जगलेल्या या अवलिया कलाकाराच्या जीवनातील काही किस्से तुम्ही कधी ऐकले नसतील तर हे किस्से पाहुयात.

किशोर कुमार हे अत्यंत प्रतिभावान गायक होते. आपल्या गायकीबरोबरच ते उत्तर अभिनेते देखील होते. विशेष म्हणजे महिलेच्या आवाजातही गाणं गायची खुबी किशोर कुमार यांच्याकडे होती. सन १९६२ मधील हाफ तिकीट या चित्रपटातील 'आके सीधी लगी दिल पे जैसी' हे गाणं किशोर कुमार यांनी मेल-फिमेल अशा दोन्ही आवाजात गायलं आहे. आधी लता मंगेशकर हे गाणं गायणार होत्या पण काही कारणांमुळं त्या गाऊ शकल्या नाहीत तर किशोर कुमार यांनी स्वतः महिलेचा आवाज दिला.

आपल्या स्वप्नातलं घर साकारण्यासाठी किशोर कुमार यांनी विशेष मेहनत घेत होते. किशोर कुमार यांना चांगल्या कल्पनाही सुचत असतं. आपल्या घराबाबत त्यांचं एक खास स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एर्किटेक्चरला आपल्या घरी बोलावलं होतं. आपलं घर असं असाव जिथं सगळीकडं पाणीच पाणी असावं. आपल्या पलंगाजवळ एक होडी असावी ज्यामध्ये बसून डायनिग हॉलपर्यंत जाता येईल. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

किशोर कुमार यांचा स्वभाव अत्यंत मुडी स्वरुपाचा होता. जर ते खूपच मूडमध्ये असतील तर एकाच वेळेत ते संपूर्ण गाण रेकॉर्ड करायचे. पण जर त्यांना एखादं गाण आवडेलेलं नसेल तर त्यांना कितीही पैसे दिले तरी ते गाण गात नसतं.

एक मजेशीर किस्सा असाही सांगितला जातो की, एकदा किशोर कुमार यांनी आपल्या मित्राला म्हटलं की, जेव्हा मी मृत्यूशयेवर असेन तेव्हा सर्व पैसा माझ्या छातीला गुंडाळलेला असेल.

किशोर कुमार यांच्या घराबाहेर एक खास साईन बोर्ड लावलेला होता. ज्यावर लिहिलं होतं की, 'बिवेअर ऑफ किशोर'.

याच संदर्भात एक किस्साही आहे की, जेव्हा निर्माता-दिग्दर्शक एच एस रवैल एकदा त्यांची भेट घेऊन घरातून बाहेर पडत होते तेव्हा किशोर कुमार यांनी त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यावर रवैल यांनी त्यांना असं का केलं हे विचारलं तर किशोर यांनी म्हटलं, माझ्या घरात घुसण्याआधी तुम्ही बाहेरचा बोर्ड वाचायला हवा होता.

किशोर कुमार आज आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या गायकीनं अजरामर केलेली अनेक गीतं अजरामर झाली आहेत. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली होती. पण यातील 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू' हे गाणं आजही खूपच लोकप्रिय आहे.

सौंदर्यवती आणि अभिनय सम्राज्ञी मधुबालाशी किशोर कुमार यांनी विवाह केला होता. या दोघांचं नात मात्र दोघांच्याही घरच्यांना पसंत नव्हतं. तर मधुबालाच्या घरच्यांचं मन वळवण्यासाठी किशोर कुमार यांनी आपला धर्मही बदलला होता.

लग्नानंतर काही दिवसातच मधुबाला यांना हृदयात छिद्र असलेल्या आजाराच निदान झालं. या आजाराशी त्यांनी तब्बल ९ वर्षे लढा दिला आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या काळात कोणतही काम करत नसल्यानं मधुबाला नैराश्याच्या गर्तेत ओढली जात होती. याकाळात आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य दिसावं यासाठी किशोर कुमार धडपडत होते. जेव्हा मधुबाला हसायची तेव्हा मी हसायचो आणि ती रडायची तेव्हा मी ही रडायचो असं किशोर कुमारनं एकदा सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com