नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच ते जर्मनीमध्ये पोहोचले आहेत. आज ते जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. यावेळी बर्लिनमधील भारतीयांनी देखील पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पाहुयात मोदींच्या भेटींचे काही क्षणचित्रे...
पंतप्रधान मोदी आज सकाळच्या सुमारास जर्मनी येथे पोहोचले. यावेळी तेथील प्रशासनाकडून मोदींचं स्वागत करण्यात आलं.
जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांच्यासोबत चर्चा करणार असून यामुळे दोन्ही देशामधील संबंध अधिक चांगले होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
बर्लिनमधील भारतीयांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. तसेच त्यांच्यासोबत गप्पा देखील मारल्या.
भारतीय चिमुकल्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींनी चिमुकल्यांची आपुलकीने विचारपूस केली.
एका भारतीय चिमुकलीने पंतप्रधान मोदींना चित्र भेट दिलं. यावेळी मोदी त्या चित्राकडे पाहतच राहिले. तसेच त्या मुलीचं कौतुक केलं.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.