पंतप्रधान मोदी सध्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ते डेन्मार्क येथे पोहोचले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच मोदींनी डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली . दोन्ही नेत्यांनी भारत-डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपबद्दल चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी कोपनहेगन येथे डेन्मार्कची दुसरी राणी मार्गारेट यांची भेट घेतली. यावेळी मार्गारेट यांनी मोदींचं जंगी स्वागत केलं.
पंतप्रधान मोदींनी राणींच्या कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
जर्मनीहून डेन्मार्कमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींचे विमानतळावर डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी स्वागत केले.
पंतप्रधान मोदींनी त्यांचे डॅनिश समकक्ष फ्रेडरिकसेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला डेन्मार्क दौरा असून, आज ते द्विपक्षीय चर्चेत सहभागी होतील.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.