PHOTO : 21-0 सौरभबाबा हिरो; निकालानंतर प्रतापगड कारखान्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

21-0 सौरभबाबा हिरो; निकालानंतर प्रतापगड कारखान्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष

Pratapgad Sugar Factory Election

प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली होती.

कुडाळ (सातारा) : जावली तालुक्यातील एकमेव औद्योगिक प्रकल्प असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी  (Pratapgad Sugar Factory Election) आज झालेल्या मतमोजणीत सौरभ शिंदे (Saurabh Shinde) गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजयाची आघाडी घेतली असल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान, निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून यात 18 पैकी 18 निकाल जाहीर झालेत. सर्व जागांवर संस्थापक पॅनेलचे उमेदवार 1200 मताधिक्याने विजयी झाल्याचं कळतंय यापूर्वी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळं आजच्या निकालानंतर 21 जागांवर सौरभ शिंदे गटाचं वर्चस्व अधोरेखित झालंय.

दि. १४ रोजी मतदान प्रकिया शांततेत पार पडली होती. त्यामध्ये ३२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता व सरासरी ५२ टक्के इतके प्रत्यक्ष मतदान झाले होते. जावळी व महाबळेश्वर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या प्रतापगड कारखान्याचे एकूण ६१५६ सभासद संख्या असून यापैकी ३२१५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली होती. त्यापैकी सौरभ शिंदे यांच्या तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनल व दीपक पवार (Deepak Pawar) यांच्या कारखाना बचाव पॅनलमध्ये या निवडणुकीसाठी चुरशीची दुरंगी लढत झाली होती.

आज सकाळपासून सभासद मतदारांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती. आठ दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आज सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य स्पष्ट  झाले. तालुक्यातील राजकीय वातावरण यानिमित्तानं ढवळून निघाले होते. ही मतमोजणी झाल्यानंतर मतदारांनी आपला कौल सौरभ शिंदे यांच्या बाजूनं दिला, हे सिध्द झालंय.

या निकालाकडं संपूर्ण जावळी तालुक्यासह (Jawali Taluka) जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जसजसे निकाल जाहीर होत गेले, तसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत 21-0  सौरभबाबा हिरो, संस्थापक पॅनेलचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत जल्लोष केलाय.

टॅग्स :SataraDeepak Pawar
go to top