Pregnancy Healthy Tipsl गर्भधारणे दरम्यान हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'या' टिप्स करा फाॅलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्भधारणे दरम्यान हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'या' टिप्स करा फाॅलो

Pregnancy

गर्भधारणे दरम्यान आणि प्रसूतीदरम्यान गर्भवती (Pregnancy) महिलेच्या हृदयावर (Heart) अधिक ताण येत असतो. जर जुळी मुलं असतील तर हृदयाच्या समस्या वाढतात. हा गुंता जर कमी करायचा असेल तर मातेला गर्भावस्थेतच योग्य आहार आणि हलका व्यायाम करणे गरजेचे असते. मात्र आहार कोणता घ्यावा, फळे कोणती खावी याची माहिती त्या गर्भवतीला तसेच तिच्या कुटुंबाला असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.Esakal

आहारात नियमित सर्व फळे आणि भाज्यांचा समावेश करा. ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषकत्वे मिळतील.

आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश केल्याने हृदयविकार टाळता येतो. दररोज किमान २ फळे आणि भाज्या खा. तुमचे वजन जास्त असेल तर आंबा, चिकू इत्यादी गोड फळे खाणे टाळा आणि हिरव्या पालेभाज्यांचे वापर जास्त करा.

फायबरचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाल्ल्याने हृदयविकार होण्यापासून बचाव करता येतो. शिवाय तुमच्या रक्तातील साखर देखील नियंत्रित करता येते. म्हणूनच भरपूर फायबरयुक्त पदार्थ जसे की भाज्या, फळे, बीन्स, नट, ओटमील आणि संपूर्ण धान्य ब्रेड आणि तृणधान्ये यांचा समावेश जरूर करा.

चिकन, मासे, अंडी, बीन्स, नट्स आणि सोया यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. रेड मीटमध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते. याचा वापर कमी प्रमाणात करा.

व्हाईट ब्रेड, पांढरा भात, पास्ता याशिवाय पॅकिंग खाद्यपदार्थांपासून लांब रहा. कारण यात साखर, मीठाचे प्रमाण जास्त असते. केवळ गहू आणि ज्वारी असणारी भाकरी किंवा पोळी खावा. सोडा, ड्रिंक्स यासारखी साखरयुक्त पेये टाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे हृदय निश्चितच आरोग्यदायी राहिल.

go to top