sakal

बोलून बातमी शोधा

मारबतीने खरंच कोरोना नेला की काय? मिरवणुकीत तुफान गर्दी, पाहा फोटो

marbat celebration

नागपूर : आज तान्ह्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात मारबत उत्सव (marbat celebration nagpur) साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचं सावट असल्याने मारबत उत्सव कमी लोकांमध्ये साजरा करण्यात येईल असे समितीकडून सांगण्यात आले होते. त्यातच नागपुरात कोरोना रुग्णसंख्या (nagpur corona cases) वाढतेय. 'कोरोनाले... घेऊन... जाय...गे...मारबत', असं साकडं नागपूरकरांनी मारबतीला घातलं होतं. मात्र, उत्सवातील तुफान गर्दी पाहून खरंच (crowd in marbat celebration)मारबतीनं कोरोना नेला की काय? असाच प्रश्न पडतोय. सकाळचे छायाचित्रकार प्रतिक बारसागडे यांनी मारबत उत्सवातील गर्दीचे टिपलेले हे काही दृश्य...

देशात फक्त नागपुरात मारबत उत्सव साजरा केला जातो. यामध्ये काळी आणि पिवळी अशा दोन मारबती असतात. दोन्ही मारबतींची नेहरू पुतळा चौकात भेट होते. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात बकाबाईने इंग्रजांशी हातमिळविणी केली होती. त्याच्या निषेधार्थ ही काळी मारबत काढली जाते. तसेच या मारबतीला रोगराई पळवून नेण्याचं आवाहन केलं जातं.

दरवर्षी मारबत उत्सवाच्या मिरवणुकीत लाखो लोकांची गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत कमी लोकांमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली होती.

प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पिवळी मारबत उत्सव कमिटीकडून काही प्रमाणात का होईना पालन करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, काळी मारबत उत्सव कमिटीने हजारोंच्या घरात गर्दी जमवून मिरवणूक काढली.

नागपुरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच गेल्या लाटेतील अनुभव पाहता नागपूरकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काळी मारबत मिरवणुकीमध्ये उल्लंघन करण्यात आले. त्यांच्यावर आता प्रशासना काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे आहे.

नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता नागपुरात तिसरी लाट आल्याचे म्हटले होते. त्यामुळे काही दिवसांत निर्बंध लावण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. पण, आता उत्सवात अशीच गर्दी व्हायला लागली तर निर्बंध लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

टॅग्स :Nagpur