Presidential Election | PHOTOS: कोणी व्हीलचेअरवर, तर कोणी PPE कीटमध्ये; मतदानासाठी 'असे' आले नेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: कोणी व्हीलचेअरवर, तर कोणी PPE कीटमध्ये; मतदानासाठी 'असे' आले नेते

Presidential Election 2022
राष्ट्रपती निवडणुकीसाठी कालच मतदान पार पडलं. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा हे दोघे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहेत.

 या निवडणुकीवेळी तब्येत ठीक नसतानाही अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.

मात्र भाजपा खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे यांच्यासह साधारण आठ खासदारांनी मतदान केलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पीपीई कीट परिधान करुन मतदान करण्यासाठी दाखल झाल्या होत्या.

तसंच केंद्रीय उर्जा मंत्री आर. के. सिंग हेदेखील पीपीई कीट घालून मतदानासाठी आले होते. या दोघांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पीपीई कीट घालून मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे व्हीलचेअरवरुन मतदानासाठी आले होते. त्यांना मतदान करतानाही इतर लोकांची मदत घ्यावी लागत होती.

त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरही अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यादव हे देखील व्हीलचेअरवरुन मतदानासाठी आले होते.