Budget 2022: 'या' पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळा सादर केलाय अर्थसंकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2022: 'या' पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळा सादर केलाय अर्थसंकल्प

Budget presented by the PM

Budget presented by the Prime Minister: देशाच्या आर्थिक आरोग्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडणे, म्हणजेच अर्थसंकल्प मांडणे ही अर्थमंत्र्यांची जबाबदारी आहे. पण देशाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांना अर्थसंकल्प सादर करावा लागला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान होते, ज्यांनी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला. (Occasions in the history of the country when the Prime Minister had to present a budget.)

1. जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru)- भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी 1958 मध्ये अर्थसंकल्प सादर केला. तत्कालीन अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यांच्या अकाली राजीनाम्यामुळे पंतप्रधान नेहरूंनी अर्थसंकल्प सादर केला. वास्तविक, टीटी कृष्णमाचारी (TT Krishnamachari) हे नेहरू सरकारमध्ये अर्थमंत्री होते. मुंद्रा घोटाळ्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे नेहरूंनी संसदेत अर्थसंकल्प मांडला.

2. इंदिरा गांधी (Indira Gandhi)- जवाहरलाल नेहरूंनंतर इंदिरा गांधी या देशाच्या दुसऱ्या पंतप्रधान होत्या, ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला. खरे तर इंदिरा सरकारमधील अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. इंदिरा गांधी यांनी 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
मोरारजी देसाई हे त्यावेळी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळत होते. जुलै १९६९ मध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्याकडून अर्थमंत्रालयाची जबाबदारी घेतली आणि त्यांना उपपंतप्रधानपद स्वीकारण्यास सांगितले. त्यावर मोरारजी देसाई यांनी तत्कालीन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या मुद्द्यावरून मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

2. इंदिरा गांधी (Indira Gandhi)- जवाहरलाल नेहरूंनंतर इंदिरा गांधी या देशाच्या दुसऱ्या पंतप्रधान होत्या, ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला. खरे तर इंदिरा सरकारमधील अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. इंदिरा गांधी यांनी 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मोरारजी देसाई हे त्यावेळी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळत होते. जुलै १९६९ मध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्याकडून अर्थमंत्रालयाची जबाबदारी घेतली आणि त्यांना उपपंतप्रधानपद स्वीकारण्यास सांगितले. त्यावर मोरारजी देसाई यांनी तत्कालीन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या मुद्द्यावरून मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

3. राजीव गांधी (Rajiv Gandhi)- जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांनी 1987 मध्ये पंतप्रधान म्हणून अर्थसंकल्प सादर केला. तत्कालीन अर्थमंत्री व्हीपी सिंह (VP Singh)सरकारमधून बाहेर पडल्यानंतर राजीव गांधी यांनीही पंतप्रधान असताना अर्थमंत्रिपद स्वीकारले आणि 1987-88 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

4. मोरारजी देसाई (Moraraji Desai) - सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. यात दोन अंतरिम बजेट आहेत. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी  पंतप्रधानपदी असताना काळात देसाई यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अर्थसंकल्प मांडला नाही.

मोरारजी देसाई यांच्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) हे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला.

मोरारजी देसाई यांच्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) हे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला.