sakal

बोलून बातमी शोधा

अखेर चांदणी चौकातील पूल पाडला, येथे पाहा PHOTOS

Pune Chandani Chowk Bridge Demolished
वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरलेला चांदणी चौकातील पूल अखेर शनिवारी मध्यरात्री एक वाजता पाडण्यात आला. नोएडा येथील ट्वीन टॉवर पाडलेल्या एडिफीस इंजिनिअरिंग कंपनीने ६०० किलोंचे विस्फोटक वापरून १.२ सेकंदात तीन ब्लास्ट करून पूल पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च झाला.

चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून काही दिवसांपासून तयारी सुरू होती. ही तयारी पूर्ण झाल्यानंतर पहाटे एक वाजता ‘ग्रीन ट्रिगर’च्या डिव्हाइसचे (एक्सप्लोडर) बटन दाबण्यात आले. त्यानंतर १.२ सेकंदात तीन ब्लास्ट झाले आणि २० मीटर लांबीचा व १० मीटर रुंदीचा हा पूल पाडण्यात आला. पूल पाडल्यानंतर दगड व माती उडू नये, यासाठी संपूर्ण पूल पांढऱ्या कपड्याने झाकला होता. परिणामी, दगडाचे तुकडे इतरत्र फेकले गेले नाही. मात्र, धुळीचे लोट मोठ्या प्रमाणात उडाले.

पूल पाडण्यापूर्वी शनिवारी सायंकाळपासूनच वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने परिसरात कलम १४४ लागू केले. पुलाजवळचा २०० मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला. रात्री अकरापासून या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. या परिसरात एडिफिस कंपनीचे केवळ चार कर्मचारी होते. त्याव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंद केला होता. दरम्यान, पूल पाडण्याच्या आधी घर गाठण्यासाठी वाहनधारकांची मोठी धांदल उडाली. त्यामुळे सायंकाळपासूनच वाहनाची कोंडी होती. परिसरात बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी ४२३ पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.

नोएडाचे ट्विन टॉवर पाडणाऱ्या कंपनीला पुण्यातील हा पूल पाडण्याची जबाबदारीही देण्यात आली होती. काही सेकंदात पूल जमिनीवर येईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सांगितले होते. यानंतर तातडीने ढिगारा साफ करण्याचे काम सुरू होईल. पुण्यातील चांदणी चौक हे मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे ते चर्चेत होता.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी चांदणी चौकात सुरू असलेल्या पुलाच्या कामाची हवाई पाहणी केली आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याआधी ऑगस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाला भेट देऊन वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला होता.

बरोबर एक वाजता स्फोट झाला अन चांदणी चौकातील वाहतूकीला अडचण ठरणारा जूना पूल पाडण्यासाठी स्फोट करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आकाशात उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान स्फोट झाल्यानंतर फक्त धुरळा उडाला कंपनीचा बोर्डही पडला नाही अशून कामगाराची प्रतिक्रिया दिली आहे.