sakal

बोलून बातमी शोधा

Photos: 20 किलो दोरा, 25 दिवसांची मेहनत, अखेर अयोध्येतील राम मंदिर साकारलंच

Ram Mandir

कोरोना संकटानंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणी आकर्षक देखावे पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळचं नाही तर घरोघरी आकर्षक देखावे तुम्ही पाहिले असतील. मात्र अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा देखावा तुम्ही अजून पहिला नसेल. पुण्यातील खराडी परिसरातील शैलेंद्र संगीता राजेंद्र कस्तुरी या तरुणाने त्याच्या राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त अगदी हुबेहूब श्री राम मंदिराची प्रतिकृती साकार केली आहे. यासाठी २५ दिवसांची मेहनत त्याने घेतली आहे.

श्रीराम मंदिराची प्रतिकृती जितकी आकर्षक दिसत आहे तितकीच कठोर मेहनत शैलेंद्र कस्तुरी आणि त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार यांनी मागच्या एक महिन्यापासून घेतली आहे. 
फोटो - शैलेंद्र कस्तुरी

श्रीराम मंदिराची प्रतिकृती जितकी आकर्षक दिसत आहे तितकीच कठोर मेहनत शैलेंद्र कस्तुरी आणि त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार यांनी मागच्या एक महिन्यापासून घेतली आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी

अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकार करण्याची संकल्पना ही स्वतः शैलेंद्र कस्तुरी यांची असून नऊ ऑगस्ट पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली होती. तर तीन सप्टेंबरला हे राम मंदिर पूर्णपणे साकार झालं.
फोटो - शैलेंद्र कस्तुरी

अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकार करण्याची संकल्पना ही स्वतः शैलेंद्र कस्तुरी यांची असून नऊ ऑगस्ट पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली होती. तर तीन सप्टेंबरला हे राम मंदिर पूर्णपणे साकार झालं. फोटो - शैलेंद्र कस्तुरी

पाऊणे आठ फूट बाय साडेपाच बाय बेचाळीस इंच अशी एकंदरीत या प्रतिकृतीची लांबी रुंदी उंची आहे. तर या मंदिर उभारणीसाठी मुख्यतः लाकूड, पुठ्ठा, दोरा यांचा वापर करण्यात आला आहे.
फोटो - शैलेंद्र कस्तुरी

पाऊणे आठ फूट बाय साडेपाच बाय बेचाळीस इंच अशी एकंदरीत या प्रतिकृतीची लांबी रुंदी उंची आहे. तर या मंदिर उभारणीसाठी मुख्यतः लाकूड, पुठ्ठा, दोरा यांचा वापर करण्यात आला आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी

या प्रतिकृतीसाठी 120 कमान, 250 कॉलमस्, 30 ते 40 शीटस, 20 किलो दोरा (10mm, 5mm, 3mm, 2mm) वापरण्यात आला आहे.
फोटो - शैलेंद्र कस्तुरी

या प्रतिकृतीसाठी 120 कमान, 250 कॉलमस्, 30 ते 40 शीटस, 20 किलो दोरा (10mm, 5mm, 3mm, 2mm) वापरण्यात आला आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी

या मंदिरासाठी 45 हजार रुपयांचा खर्च शैलेंद्र यांनी केला असून याचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. तर मंदिर पूर्णपणे साकार करण्यासाठी एकूण 25 दिवसांचा कालावधी लागला आहे. 
फोटो - शैलेंद्र कस्तुरी

या मंदिरासाठी 45 हजार रुपयांचा खर्च शैलेंद्र यांनी केला असून याचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. तर मंदिर पूर्णपणे साकार करण्यासाठी एकूण 25 दिवसांचा कालावधी लागला आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी

 2021 मध्ये शैलेंद्र यांनी केदारनाथ मंदिराचा देखावा साकार केला होता तेव्हा त्यांच्या देखाव्याला अख्ख्या पुण्यातून टॉप 5 मध्ये पारितोषिक मिळालं होतं. 
फोटो - शैलेंद्र कस्तुरी

2021 मध्ये शैलेंद्र यांनी केदारनाथ मंदिराचा देखावा साकार केला होता तेव्हा त्यांच्या देखाव्याला अख्ख्या पुण्यातून टॉप 5 मध्ये पारितोषिक मिळालं होतं. फोटो - शैलेंद्र कस्तुरी

एखादी वास्तू साकारण्यासाठी इंजिनिअर किंवा आर्किटेक्चर असण्याची गरज नाही तर इच्छा शक्ती प्रबळ असायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शैलेंद्र कस्तुरी यांनी साकारलेले श्रीराम मंदिर.
फोटो - शैलेंद्र कस्तुरी

एखादी वास्तू साकारण्यासाठी इंजिनिअर किंवा आर्किटेक्चर असण्याची गरज नाही तर इच्छा शक्ती प्रबळ असायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शैलेंद्र कस्तुरी यांनी साकारलेले श्रीराम मंदिर. फोटो - शैलेंद्र कस्तुरी