Fri, March 24, 2023
Pune : सिंहगड रस्ता रंगला हास्यरंगात; अजरामर 'पुलं'च्या आठवणी जागवल्या
Published on : 14 March 2023, 10:43 am
पुण्यातला नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता सध्या पु.लंच्या रंगात रंगला आहे.
पु.ल. देशपांडे हे पुण्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव आहेत.
त्यांचं अजरामर लेखन हे केवळ जुन्याच नव्हे तर नव्या पिढीच्याही कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय ठरतो.
विद्यार्थी, युवक व नागरिकांना पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तीमत्वाचा परिचय व्हावा या उद्देशाने नाट्य, संगीत, साहित्य क्षेत्रातील बहुरूपी पुलंचे म्युरलस् पदपथावर लावण्यात आले आहेत.
पु.ल. देशपांडे यांच्या काही गाजलेल्या ओळी, विचार हे या म्युरल्सच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर..? जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती..!
भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो.. आणि रिकामा खिसा जगातील ‘माणसं’ दाखवतो...
छायाचित्रकार - शहाजी जाधव