sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात संततधार सुरुच; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

konkan rain

मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणसह राज्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. दरम्यान, कालपासून कोकणात पावसाची संततधार सुरु असल्याने नद्यांच्या पाणापातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसचं या पावसाचा जोर कोकणात अधिक असेल असंही स्पष्ट केलं आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यानं कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.

पावसाचा जोर अधिक असल्याने काही पुलांवर पाणी आले त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. कणकवलीतील बावशी गावठण येथे कोसळले घर आहे.

कोकणा सह रत्नागिरी जिल्ह्यात ही मुसळधार पाऊस पडत असून या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे काही भागांत पाणी साचले आहे.

शेतीच्या कामांना वेग आला असून पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे.

काही दुकानांत पाणी आल्याने एकच दुकानदारांची धावपळ उडाली आहे. अचानक पाणी वाढल्याने गडबड सुरु आहे.

दरम्यान, काही रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.