PHOTO : चारधाम यात्रेत पोहोचले विक्रमी 12 लाख भाविक; आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारधाम यात्रेत पोहोचले विक्रमी 12 लाख भाविक; आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू

Uttarakhand Chardham Yatra

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला यंदा विक्रमी संख्येनं भाविक पोहोचत आहेत.

चमोली : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला (Uttarakhand Chardham Yatra) यंदा विक्रमी संख्येनं भाविक पोहोचत असताना, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा यात्रेकरूंच्या मृत्यूत मोठी वाढ झालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी सुमारे 12 लाख 83 हजार भाविक चार धामांमध्ये दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्याचबरोबर या प्रवासादरम्यान मृतांचा आकडा 106 वर पोहोचलाय.

चारधाम यात्रेदरम्यान केदारनाथ (Kedarnath Dham) आणि बद्रीनाथ (Badrinath Dham) धाममध्ये भाविकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. बद्रीनाथ धाममध्ये आतापर्यंत 4 लाख 28 हजार भाविक दर्शनासाठी पोहोचले आहेत.

त्याचवेळी 4 लाख 22 हजार भाविकांनी केदारनाथ धामचं दर्शन घेतलंय. याशिवाय गंगोत्री धाममध्ये 2 लाख 38 हजार, तर यमुनोत्री धाममध्ये 1 लाख 77 हजार भाविक आले होते. तसेच 16 हजार भाविक शिखांचं पवित्र स्थान हेमकुंड साहिब इथं पोहोचले आहेत.

या यात्रेतील मृतांची संख्या 106 वर पोहोचलीय. यामध्ये 78 पुरुष आणि 28 महिलांचा समावेश आहेत.

मृतांमध्ये केदारनाथमध्ये सर्वाधिक 50 प्रवाशांचा मृत्यू झालाय. याशिवाय बद्रीनाथमध्ये 21, यमुनोत्रीमध्ये 28 आणि गंगोत्री धाममध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :UttarakhandChardham Yatra
go to top