sakal

बोलून बातमी शोधा

Photo: उद्धव ठाकरे गटाचं खातं उघडून देणाऱ्या ऋतुजा लटके ठाकरेंच्या भेटीला!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. ऋतुजा लटके यांनी निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सेना नेते अनिल परब देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात काही दिवसांपासून राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ६६२४७ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ऋतुजा लटके यांचे रश्मी ठाकरे यांनी स्वत: औक्षण केले. यावेळी शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहिला  मिळाला.

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी ऋतुजा लटके याचा विजय आवश्यक होता.

अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले, त्यावेळी मातोश्रीवर शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळाला.

भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता.

 ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यावर त्यांचे सासरे कोंदिराम लटके यांना अश्रू अनावर झाले होते. तिच्या पतीने जनतेसाठी जे काही केलं, ते तिनेही करावं” अशा भावना कोंदिराम लटके यांनी व्यक्त केल्या होत्या.