सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०

शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

तरुणींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांचा सर्वगुणसंपन्न विकास होण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला राज्यातील तरुणींनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये तरुणींनी विविध प्रकारांमध्ये पारितोषिके मिळविली. त्याची छायाचित्रमय झलक... (सर्व छायाचित्रे - विश्‍वजित पवार)

महाराष्ट्राची सौंदर्यसम्राज्ञी होणे, हे माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. अनेक महिन्यांची मेहनत आणि अनेक लोकांचे परिश्रम यामागे आहेत. आई-बाबा आणि औरंगाबादचे नाव मी मोठे केले, याचा मला खूप आनंद होत आहे; पण तरीही माझ्यापेक्षा महत्त्वाचा उद्देश माझ्यासमोर आहे आणि त्यावर मी विश्वास ठेवते. या यशानंतर पुढील प्रवासासाठी मी खूप उत्साहित आहे. 
- बेला लोळगे, मुख्य विजेती

या स्पर्धेत सहभागी झाल्याने मला खूपच आनंद होत आहे. ‘सकाळ’ने आमच्या कलागुणांना वाव देणारं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि तेही निःशुल्क. आयोजकांनी फक्त आम्हा मुलींचा विचार न करता आमच्या पालकांचाही तितकाच विचार केला आणि मान राखला. सौंदर्य स्पर्धेशिवाय आम्हाला पुरस्कार सोहळ्याचाही आनंद मिळाला. लोवेल सरांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथवर पोचून मान कमावला आहे. 
- मिताली श्रीवास्तव, फर्स्ट रनरअप

सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होणे, हे फक्त सौंदर्यापुरते मर्यादित नसते. त्यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचे आणि आदर्श घडवायची जबाबदारी आहे. हा टायटल जिंकून आपल्या शहराचे नाव अधिक उंचावल्यामुळे मला अभिमान वाटतो. तुम्ही जसे प्रयत्न करता तसेच यश तुमच्या पदरी पडते.
- रिया जोशी, सेकंड रनरअप