PHOTOS : धर्मवीर संभाजी राजेंबद्दल 'या' गोष्टी माहिती असायला हव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS : धर्मवीर संभाजी राजेंबद्दल 'या' गोष्टी माहिती असायला हव्यात

chhatrapati sambhaji maharaj jayanti 2022 these things you must know about chhatrapati sambhaji maharaj rak94

छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या जन्म पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ झाला होता. संभाजीराजांना स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा या त्यांच्या गुणांसाठी ओळखलं जातं, आज आपण त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत..

संभाजी राजांबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, संभाजी राजे हे अत्यंत हुशार होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते, तसेच संस्कृत भाषेवर विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

संभाजी महाराज गडावर बसून राज्यकारभार करण्यातले नव्हते. त्यांनी रणांगणात उतरत असंख्य वेळा शत्रूविरोधात जोरदार लढाई केली.

छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारात निपूण आणि कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती.

युध्दात शत्रूविरोधात गनिमी काव्याचा जोरदार वापर करत त्यांनी शत्रूंना धूळ चारली. त्यांच्या युध्द या कौशल्याच्या जोरावर त्यांनी शत्रुंना झुंजवत ठेवलं.

संभाजी राजेंच्या परक्रमाबद्दल बोलावे तितके कमी पडेल.राजेनी  आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत.

संभाजी राजे हे धर्मकार्यात देखील अग्रेसर होते. त्यांनी समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिराची उभारणी केली तसेच शिवाजी महाराजांनंतर ते महाराष्ट्रातील संताना सर्वतोपरी मदत करत राहीले.

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. दरम्यान संभाजीराजे यांनी त्याआधीच राजकारणातील बारकावे आणि रणांगणावरील डावपेच शिकून घेतले होते.

संभाजी राजेंनी तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच त्यांनी इतरही अनेक विषयांवर या ग्रथांत लिखाण केले आहे.

१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला करत राजेंना पकडलं.

औरंगजेबाने केलेले अत्याचार ४० दिवस सहन केल्यानंतर फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली. आजही छत्रपती संभाजी महारांज हे हजारोंसाठी प्रेरणास्क्त्रोत आहेत.

go to top