Thur, March 30, 2023
PHOTOS : शिवबा जन्मले, विश्व आनंदले, गाऊ लागले चराचर...; शिवनेरीवर जन्मसोहळा थाटात साजरा
Published on : 19 February 2023, 6:51 am
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे.
शिवजन्माचं ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा झाला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यास उपस्थित होते.
राज्य सरकारच्या वतीनं या शासकीय सोहळ्याचं आयोजन केलं जातं.
राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीनं दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं जातं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतला हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरतो.
लाखो शिवप्रेमी या निमित्त शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात.
यावेळी काही साहसी खेळांचं प्रदर्शनही करण्यात आलं.
सर्व फोटो - जिल्हा माहिती कार्यालय व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर हँडल